मी बाहेर आलोय आता भ्रमातून…
आता पाहीन मी जगाकडे
फक्त माझ्या चष्म्यातून…
आता कोणी सुटणार नाही
माझ्या चाणाक्ष नजरेतून…
माझे मौन मी आता
कायमचे सोडणार आहे…
गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची
आता किंमत लावणार आहे…
प्रत्येक दिवस आता फक्त
माझा असणार आहे…
माझे प्रत्येक पाऊल
आता यशावर पडणार आहे…
मिळविण्यासाठी जे जे असते
ते मी मिळविणार आहे…
प्रत्येक प्रश्नचे उत्तर
तोंडावर मारणार आहे…
भ्रमात होता बरा होता जग म्हणेल…
कवी – निलेश बामणे ( बी डी एन )
Leave a Reply