नवीन लेखन...

भ्रमर

मधासाठी मधुर प्रेमाच्या भ्रमर मी होतो प्रियकर फुलराणीचा
चाखून मधुर मध तिच्या प्रेमाच मदहोश होत होतो ….

मधासाठी मधुर प्रेमाच्या कधी ह्या फुलराणीच्या तर कधी
त्या फुलराणीच्या प्रेमात वाहत भ्रमर मी जात होतो …

मधासाठी मधूर प्रेमाच्या रोज नव- नवीन फुलराणीला
प्रेमात पाडून प्रेमाला बदनाम भ्रमर मी करत होतो …

मधासाठी मधुर प्रेमाच्या रोज एका फुलराणीचे नाजूक हृदय
माझ्या काटेरी पायाखाली भ्रमर मी तुडवत होतो ….

मधासाठी मधुर प्रेमाच्या नजरेत प्रत्येक फुलराणीच्या
धोकेबाज, दगाबाज,आणि लंपट म्हणून बदनाम भ्रमर मी होत होतो …

मधासाठी मधुर प्रेमाच्या जेव्हा कधी खरोखरच
एखाद्या फुलराणीच्या प्रेमात पडणार होतो

तेव्हा निश्चितच प्रेमावर बळी भ्रमर मी जाणार होतो……….

कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..