नवीन लेखन...

मज्जातंतूच्या शिरांचे विकार

सौम्य प्रमाणात मुंग्या येणे अथवा शरीराचा एखादा भाग बधिर होणे हा प्रकार वरचेवर घडत असेल, तर त्यामागचे कारण वेळीच शोधायला हवे. कदाचित मज्जारज्जूच्या शिरांना अपाय झाल्याने असे होऊ शकते. मज्जातंतू मज्जारज्जूतून बाहेर पडतात. थोड्याच अंतरावर त्यातील काही तंतू एकमेकांजवळ येतात व त्या गठ्ठ्याच्या शिरा बनतात. या शरीराच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या भागात कार्य करतात, म्हणून त्यांना पेरिफरल (परिघाच्या बाजूच्या) मज्जारज्जूच्या शिरा (नव्ह्‌र्ज) म्हटले जाते. या शिरांना अनेक कारणांनी अपाय होणे संभवते. अशा विकारांना पेरिफरल न्यूरोपथी म्हणतात. पेरिफरल नव्ह्‌र्जमुळे आपला मेंदू आपल्या शरीरातील एकूण एक लहानसहान भागाला जोडला जातो. कोणत्या जागेच्या शिरा आणि किती प्रमाणात अपाय झाला आहे, यावर लक्षणे ठरतात. बहुतेक सर्व प्रकारांत सुरवात सौम्य प्रमाणात मुंग्या येणे व भाग बधिर होणे अशी होते. हळूहळू काही महिन्यांनी अथवा वर्षांनी शरीराचे भाग बधिर होतात. मधुमेह या आजारात पावलात आलेल्या बधिरपणामुळे तेथे जखमा झालेल्या रुग्णांच्या लवकर लक्षात येत नाहीत. तेथे जंतुजन्य दाह झालेलादेखील समजत नाही. पावलात असे घडते, ही गोष्ट अनेक मधुमेही रुग्णांत घडते. शरीराच्या इतर भागातही असे घडू शकते. नजर अस्पष्ट होणे, रक्तदाब उतरणे, मूत्रविरेचनात अडथळे जाणवणे, पोट फुगणे, आतड्यांची हालचाल कमी किंवा जास्त होऊन मलावरोध किंवा पोटात कळा येणे आणि पुरुषांत लैंगिक दुर्बलता येणे, अशा विविध प्रकारचे त्रास रुग्णांना होऊ शकतात. हे पेरिफरल न्यूरोपथीचे आजार होण्याची अनेक कारणे असू शकतात. दीर्घ काळ मद्यसेवन, मधुमेह, शरीरात कोठेही (सुप्तदेखील) कॅन्सरची गाठ निर्माण होणे, मूत्रपिंडे अकार्यक्षम होणे, जीवनसत्त्वे ब 1, ब 6 किंवा ब 12 याचा आहारात अभाव होणे, शिसे जास्त प्रमाणात शरीरात जाणे, मुंग्या येण्यासारखे त्रास ताब्यात आणणे त्यामानाने कठीण असते. हेटेरोसायस्लिक प्रकारची औषधे वेदना ताब्यात आणण्यासाठी उपयोगी असतात. या औषधांचा फायदा औषधे घेण्यास सुरू केल्यापासून काही आठवड्यांनंतरच दिसू लागतो. दीर्घ काळ मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये मद्यपानाचे अनेक दुष्परिणाम दिसू लागतात. सर्व प्रकारच्या मद्य-पेयांत इथाईल अल्कॉहॉल नावाचे रासायनिक द्रव्य असते. आपल्या शरीरात यकृतातील पेशीने या इथाईल अल्कॉहॉलच्या रेणूचे विघटन होते व प्रथम ऍसिटाल्डिहाईड नावाचा रेणू तयार होतो.

ऍसिटाल्डिहाईडचे रूपांतर ऍसिटिक ऍसिड या रेणूत होते. ऍसिटिक ऍसिडचे रूपांतर कार्बन-डाय-ऑक्सातईड आणि पाणी या रेणूत होऊन ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. या सर्व प्रक्रियांना दहा तास लागतात. ऍसिटाल्डिहाईड आणि ऍसिटिक ऍसिड हे रेणू शरीराच्या एकूण एक पेशींना घातकारक असतात.

शरीरात दहा तासांच्या अवधीत हे रेणू संपूर्ण शरीरभर फिरतात. यकृत, मेंदू, हृदयाचे स्नायू, स्वादुपिंड, जठर, लहान व मोठे आतडे, मूत्राशय इत्यादी सर्व अवयवांवर दारूचा दुष्परिमाण होतो. याचबरोबर पेरिफरल नव्ह्‌र्जच्या पेशीदेखील मृत होतात. परिणामी हात, पाय बधिर होतात. तेथे मुंग्या येणे, वेदना होणे असे त्रास अहोरात्र होतात. हातपाय कमजोर होतात. चालना येईनासे होते. एकदा या मज्जातंतूंच्या शिरा अशा प्रकारे विकारग्रस्त झाल्या की त्या पूर्ववत बऱ्या होतील, असा उपाय अद्ययावत सापडलेला नाही. मूळतःच दारूला स्पर्शही न करणे व घेणाऱ्यांनी तत्काळ पूर्णपणे वर्ज्य करणे अत्यंत आवश्याक आहे. शरीरात कॅन्सरच्या गाठी वाढू लागल्या की त्या पेशींना जीवनावश्यणक तत्त्वे, जीवनसत्त्वे इत्यादी मोठ्या प्रमाणात लागतात. परिणामी, शरीरातील पेशींना त्या कमी पडू लागतात. शिवाय या विकृत पेशी काही द्रव्ये स्रवतात. या द्रव्यांमुळे अन्नपेशींना अपाय होतो. परिणामी, पेरिफरल न्यूरोपथी होते. कधी कधी खुद्द कॅन्सरचा आकार फार मोठा नसतो. त्यामुळे जेथे कॅन्सर होतो त्या जागेवर फारसा त्रास होतही नाही. असा छुपा कॅन्सर जठर, मोठे आतडे, थॉयरॉईड ग्रंथी व श्वारसनलिका येथे असण्याचा संभव बराच असतो. मूळ कॅन्सर काढून टाकला की या पेरिफरल न्यूरोपथीचे त्रास शमू लागतात. मूत्रपिंडांचे कार्य नीट होत नसल्यास शरीरात बरेच बदल होतात. महत्त्वाच्या क्षारांची पातळी योग्य राहत नाही.

मूत्रपिंडाचे कार्य पुन्हा व्यवस्थित झाल्याखेरीज ही तक्रार जाऊ शकत नाही. काही जड धातूंचे रेणू शरीरात गेल्यास त्यांच्या अपायामुळे पेरिफरल न्यूरोपथी होतो. सुवर्ण, चांदी, पारा, आर्सेनिक किंवा शिसे अशा धातूंचे रेणू अपायकारक असतात. आपण सेवतो त्या औषधांत रासायनिक पृथक्कणरणाच्या परीक्षणातून असली द्रव्ये नाहीत याची खात्री करून मगच कोणतेही औषध घ्यावे. काही जीवनसत्त्वे मज्जापेशींच्या कामाला अधिक महत्त्वाची असतात. जीवनसत्त्व ब संकुलातील ब 1, ब 6 व ब 12 ही विशेष महत्त्वाची असतात. त्यांचा आहारातील अभाव हे पेरिफरल न्यूरोपथीचे कारण असते. पॉलिश्डा भातच खाणे, मैदा खाणे, दूध न घेता इतर आहार पूर्ण शाकाहारी असणे, अशा कारणांतून हे अभाव निर्माण होतात. आपल्या रक्तवाहिन्यांवर स्वतःच्या शरीरात स्वतःच्या शरीरातील पेशींच्या विरुद्ध निर्माण झालेल्या प्रतिपिंडाचा दुष्परिणाम होतो. या आजाराला पेडिआर्टरायटिस नोडिसा म्हणतात. या आजारात मज्जातंतूंना जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत दोष निर्माण झाल्याने पेरिफरल न्यूरोपथी होतो. थॉयरॉईड ग्रंथीच्या आजारातदेखील पेरिफरल न्यूरोपथी होते. पेरिफरल न्यूरोपथी हे अनेक विकारांचे लक्षण असते. कारण शोधून मगच खरा इलाज होऊ शकतो.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..