नवीन लेखन...

मधुमेह

मधुमेह आपल्या देशाची वाढती समस्या आहे. या जगात मधुमेहींच्या गणनेमध्ये आपला दुसरा नंबर येतो. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेह असून ही फार काळजीची बाब आहे. मधुमेहाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याची काही लक्षणे नसतात. उदा. जेव्हा आपल्याला संसर्ग झाला की ताप येतो, पोट बिघडले की मग पोट दुखते- पण मधुमेहात मात्र असे काहीही होत नाही. मधुमेहाची जी लक्षणे आहेत- खूप भूक लागणे, खूप तहान लागणे, खूप लघवी होणे, ही रक्तातील साखर फार जास्त प्रमाणात वाढल्यावरची लक्षणे आहेत. पण रक्तातील साखर हळूहळू जास्त होते.

सर्वसाधारण प्रमाणापेक्षा थोडी जास्त साखर रक्तात असताना जर कळली तर त्यावर त्वरित इलाज-पथ्य करून ती आटोक्यात आणता येते. परिणामी मधुमेहामुळे शरीरात होणारी गुंतागुंत टाळता येते. पण ही थोडी वाढलेली साखर रक्ताचा तपास केल्यावरच कळते. त्यामुळे रक्ताचा तपास करणे आवश्यक आहे. जर आपल्या आई-वडील किंवा बहीण-भावाला मधुमेह असेल तर मधुमेहाची चाचणी नियमित रूपाने करणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यावर त्याचे पथ्यपाणी व इलाज करण्यापेक्षा तो टाळता यावा यावर भर दिला पाहिजे. ‘Prevention is better than cure’ अशी म्हणच आहे. मधुमेह टाळण्याकरता वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे. खूप गोड खाल्ले की मधुमेह होतो हा चुकीचा समज आहे. गोड खाऊन मधुमेह होत नाही- पण खूप गोड पदार्थ खाल्ले की वजन वाढते, पोटावरची चरबी (abdominal fat) वाढते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

मधुमेह टाळण्याचा सोपा उपाय आहे की ‘पोटभर खाऊ नका व पोट रिकामे ठेवू नका’! पोट रिकामे ठेवले- खूप भूक लागली की मग आपण विचार न करता खातो, गरजेपेक्षा जास्त खातो व वजन वाढते व अती खाण्यामुळे रक्तातील साखर वर-खाली होऊ शकते. आपण खाताना, आपल्याला किती अन्नाची गरज आहे हे जाणून व समजून घेणे आवश्यक आहे. जर आपल्या रोजच्या जेवणानेही आपले वजन सतत वाढत आहे, असे कळले की हे अन्न आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे हे आपणास समजले पाहिजे. कोणी आपल्याहून जास्त खाते यावर लक्ष न देता- आपल्याला अन्नाची किती गरज आहे, हे समजले पाहिजे. जर वजन वाढत असेल तर अन्नाचे प्रमाण कमी केले पाहिजे.

अन्नाची निवडही बरोबर केली पाहिजे. उदा. भात खाऊन वजन वाढते, मधुमेह असेल तर रक्तातील साखर वाढते, म्हणून बरेच लोक साखरेचे प्रमाण वाढले किंवा वजन कमी करायचे असेल तर भात सोडतात. पण मग कमी खाऊन पोट भरत नाही म्हणून पोळीचे प्रमाण वाढवतात. पण असे करताना पोळी व भात खाऊन साखर वाढते, वजन वाढते. त्यामुळे पोळी जास्त घेण्यापेक्षा सॅलड, भाजी, आमटी यांचे प्रमाण वाढवावे. किंवा दही, उसळ यांचे प्रमाण वाढवायला पाहिजे. त्याचबरोबर आहाराबद्दलचे गैरसमजही समजून घेतले पाहिजेत. उदा. मधुमेहींना साखर चालत नाही, पण गूळ नैसर्गिक असल्यामुळे चालतो किंवा मधसुद्धा चालतो. हा फार मोठा गैरसमज आहे. असे केल्यामुळे मधुमेह आटोक्यात ठेवणे कठीण होते. शरीरात साखर, गूळ व मध हे सर्व एकाच प्रकारे काम करतात व समप्रमाणात साखर वाढवतात. त्यामुळे हे तीनही पदार्थ टाळावेत.

साखर मधुमेहींना वज्र्य आहे हे ज्ञान सर्वाना असते, पण स्निग्ध पदार्थही मधुमेहींना तेवढेच हानीकारक आहेत. हे फार कमी लोकांना कळते. एक विशिष्ट प्रकारचा स्निग्ध पदार्थ – ‘Trans fats’ हा सर्वात हानीकारकआहे. ट्रान्सफॅट हा डालडा, मार्गरीन इत्यादी पदाथार्ंत आढळतो. या प्रकारचे स्निग्ध पदार्थ वापरूनच फराळाचे पदार्थ, मिठाया इत्यादी तयार होतात. त्यामुळे असे पदार्थ टाळावेत. त्याचप्रमाणे इतर स्निग्ध पदार्थसुद्धा कमीतकमी प्रमाणात वापरावेत. तेल अती उकळले / तापविले की त्यात ‘Trans fats’ तयार होतात. हे तेल परत वापरले तर हे ‘Trans fats’ तयार केलेल्या पदार्थात येतात व त्यामुळे मधुमेहीला त्रास होऊ शकतो. स्निग्ध पदार्थात ऊर्जा इतर अन्नपदार्थापेक्षा जास्त असते व त्यामुळे त्याच्या सेवनाने वजन लगेचच वाढते. त्यामुळे स्वयंपाक करताना कमीतकमी प्रमाणात तेल, तूप, लोणी, ओले-सुके खोबरे, दाण्याचे कूट वापरावे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..