महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यापासून राजकीय निरीक्षकांपासून प्रत्यक्ष राजकारणातीलही कित्येकांना मनसेच्या अस्तित्वा बद्दल चिंता वाटू लागली आहे. खुद्द राजसाहेबांनी या सर्वावर अजून फारसे भाष्य केलेले नसले तरी मनसेची आग विजली आहे असं नाही म्ह्णता येणार ! उलट आता त्या आगीच पुन्हा ठिणगीत रूपांतर झालयं असं म्ह्णायला वाव आहे. राजकीय महत्वकांक्षेतून आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या स्वप्नातून मनसेची निर्मिती झाली असेल तर मनसेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याला कारणच नाही. सुरूवातीपासून परप्रांतियांच्या विरोधातच मनसेची भुमिका आहे असा अपप्रचार मोठ्या प्रमाणात केला गेला त्याचा तोटा या ही निवडणुकीत मनसेला सहन करावा लागला. राज ठाकरे साहेबांव्यतिरीक्त मनसेत राजसाहेबांची भुमिका प्रभावीपणे आणि अधिक प्रखरपणाने मांडू शकेल असा दुसरा कोणी दिसत नाही. मनसेला मानणारे सर्वच राजसाहेंबापर्यत पोहचू शकत नाहीत. राजसाहेबांच्या सभांना होणारी गर्दी लोकांच राजसाहेबांवर किती अतोनात प्रेम ही स्पष्ट करीत असले तरी मनसे पक्ष म्ह्णून लोकांच्या मनात खोलवर रूजायला कमी पडलेला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. मनसेच अपयश लक्षात घेता काही लोक मनसे सोडतीलही पण त्यामुळे पक्षाला काहीच तोटा होणार नाही झाला तर फायदाच होईल. मनसेच्या या पडत्या काळात जे मनसे सोबत राहतील ते भविष्यात फायद्यात राहतील. राज ठाकरे साहेबांचा करिष्मा वगैरे उतरला आहे असं काही ही झालेले नाही. यापुढच्या ही राजसाहेबांच्या सभांना लोकांची गर्दी ही होणारच. मनसेला आता आपल्या पक्षाची नव्याने बांधणी करायला हवी. राजकीय महत्वकांक्षा बाळगणार्यांची आपल्या राज्यात कमी नाही पण त्यासोबत महाराष्ट्राच्या विकासाची महत्वकांक्षा उराशी बाळगणार्या कार्यकर्त्यांची मनसेला अधिक गरज आहे. मनसे घराघरात पोहचली होतीच पण आता त्यांना चुळीपर्यत पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करायला हवी. मनसे सोबत असणारे मराठी तरूण अपयशाने खचून जाणार नाहीत उलट ते अधिक जोमाने कार्य करू लागतील. पुढे होणार्या निवडणुकात मनसेला इतक्या दारून पराभवाचा सामना करावा लागणारच नाही. राजकीय अभ्यासक जे आता मनसेला कोपर्यात पाहता आहेत त्यांच्यावर भुवया उंचावण्याची वेळ आल्यावाचून राहणार नाही इतकी ताकद राजसाहेबांच्या महाराष्ट्राच्या विकासाबाबत पाहिलेल्या स्वप्नात आहे. आता गरज आहे ती त्यांच्या स्वप्नाच्या पुर्ततेसाठी प्रत्येक पाऊल मोजून – मापून टाकण्याची कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जराही गाफील राहणं आता मनसेला परवडणार नाही. मनसे पराभवाने खचून न जाता आता राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरूवात करेल असा एक आशेचा किरण दिसतोय आज प्रत्येक मनसैनिकला…
लेखक – निलेश बामणे
Leave a Reply