नवीन लेखन...

मनाचे श्लोक – ११ ते २०

जगीं सर्व सूखी असा कोण आहे | विचारी मना तूंचि शोधूनि पाहे |
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले | तयासारिखे भोगणे प्राफ्त झाले ||11||

मना मानसी दुःख आणू नको रे | मना सर्वथा शोक च़िंता नको रे |
विवेकें देहबुध्दि सोडूनि द्यावी | विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ||12||

मना सांग पां रावणा काय झाले | आकस्मात ते राज्य सर्वै बुडाले |
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं | बळे लागला काळ हा पाठलागी ||13||

जिवा कर्मयोगें जनी जन्म झाला | परी शेवटीं काळमूखी निमाला |
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले | कितीएक ते जन्मले आणि मेले ||14||

मना पाहता सत्य हे मृत्यभूमी | जितां बोलती सर्वही जीव मी मी |
चिरंजीव हे सर्वही मानिताती | आकस्मात सांडूनिया सर्व जाती ||15||

मरे ऐक त्याचा दुजा शोक वाहे | आकस्मात तोही पुढे जात आहे |
पुरेना जनी लोभ रे क्षोभ होतो | म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतो ||16||

मनीं मानव व्यर्थ चिंता वहाते | आकस्मात होणार होऊन जाते |
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे | मतीमंद ते खेद मानी वियोगे ||17||

मना राघवेवीण आशा नको रे | मना मानवाची नको कीर्ति तू रे |
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे | तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ||18||

मना सर्वथा सत्य सोडू नको रे | मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे |
मना सत्य ते स्ा़त्य वाचे वदावे | मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ||19||

बहू हिंपुटी होज्ञख्154लृजे मायपोटी | नको रे मना यातना तेचि मोठी |
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी | अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ||20||

– श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक  (क्रमशः) 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..