नवीन लेखन...

मनाचे श्लोक – १८१ ते १९०

नव्हे चेटकी चाळकू दःव्यभोंदू | नव्हे निंदकू मत्सरू भक्तीमंदू |
नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू | जनी ज्ञानिया तोचि साधू अगाधू ||181||

नव्हे वाउगी चाऊटी काम पोटी | किःयेवीण वाचाळता तेचि मोठी |
मुखी बोलिल्यासारिखे चालताहे | मना सदगुरू तोचि शोधूनि पाहे ||182||

जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी | कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी |
प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे | तयाचेन योगे समाधान बाणे ||183||

नव्हे तेचि जाले नसे तेचि आले | कळो लागले सज्जनाचेनि बोले |
अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे | मना संत आनंत शोधीत जावे ||184||

लपावे अती आदरे रामरूपी | भयातीत निश्र्चीत ये सस्वरूपी |
कदा तो जनी पाहताही दिसेना | सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ||185||

सदा सर्वदा राम सन्नीध आहे | मना सज्जना सत्य शोधून पाहे |
अखंडीत भेटी रघूराजयोगू | मना सांडि रे मीपणाचा वियोगु ||186||

भुते पिंड ब्रम्हांड हे ऐक्य आहे | परी सर्वही सस्वरूपी न साहे |
मना भासले सर्व कांही पहावे | परी संग सोडूनि सूखी राहावे ||187||

देहेभान हे ज्ञानशास्त्रे खुडावे | विदेहीपणे भक्तीमार्गेचि जावे |
विरक्तीबळे निंध सर्वे त्यजावे | परी संग सोडूनि सूखे रहावे ||188||

मही निर्मिली देव तो ओळखावा | जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा |
तया निर्गुणालागि गूणी पहावे | परी संग सोडूनि सूखे रहावे ||189||

नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता | परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता |
तया निर्विकल्पासि कल्पीत जावे | परी संग सोडूनि सूखे राहावे ||190||

श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..