नवीन लेखन...

मनाचे श्लोक – १ ते १०

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा | मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |
नमूशारदा मूळ चत्वार वाचा | गमू पंथ आनंत या राघवाचा ||1 | |

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे | तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे |
जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे | जनी वंद्य ते सर्वभावे करावे ||2 | |

प्रभाते मनी राम चिंतीत जावा | पुढे वैखरी राम आधी वदावा |
सदाचार हा थोर सोडू नये तो | जनी तोचि तो मानवी धन्य होतो ||3 | |

मना वासना दुष्ट कामा नये रे | मना सर्वथा पापबुध्दी नको रे |
मना धर्मता नीति सोडू नको हो |मना अंतरी सार वीचार राहो ||4 | |

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा | मना सत्यसंकल्प जीवीं धरावा |
मना कल्पना ते नको वीषयांची | विकारे घडे हो जनी सर्व ची ची ||5 | |

नको रे मना कोध हा खेदकारी | नको रे मना काम नाना विकारी |
नको रे मना लोभ हा अंगकारु | नको रे मना मत्सरु दंभभारु ||6 ||

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे | मना बोलणे नीच सोशीत जावे |
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे | मना सर्व लोकांसि रे नीववावे ||7 | |

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी | मना सज्जना हेचिं क्रिया धरावी |
मना चंदनाचे परी त्वां झिजावे | परी अंतरी सज्जना नीववावे ||8 | |

नको रे मना दव्य ते पूढिलांचे | अति स्वार्थबुध्दी न रे पाप सांचे |
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे | न होता मनासारखे दुःख मोठे ||9 | |

सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी | सुखाची स्वये सांडि जीवी करावी |
देहेदुःख हे सूख मानीत जावे | विवेकें सदा सस्वरुपीं भरावें ||10||

श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक  (क्रमशः)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..