नवीन लेखन...

मनाचे श्लोक – ७१ ते ८०

जयाचेनि नामे महा दोष जाती | जयाचेनि नामे गती पाविजेती |
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||71||

न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ कांही | मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही |
महा घोर संसार शत्रु जिणावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||72||

देहेदंडणेचे महादुःख आहे | महादुःख ते नाम घेता न राहे |
सदाशीव चिंतीतसे देवदेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||73||

बहूतांपरी संकटे साधनांची | व्रते दान उद्यापने ती धनाची |
दिनाचा दयाळू मनी आठवावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||74||

समस्तामध्ये सार साचार आहे | कळेना तरी सर्व शोधूनि पाहे |
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||75||

नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही | नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही |
म्हणे दास विश्वास नामीं धरावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||76||

करी काम निष्काम या राघवाचे | करी रुप स्वरुप सर्वा जिवाचे |
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता | हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ||77||

अहो ज्या नरा रामविश्वास नाही | ताया पामरा बाधिजे सर्व कांही |
महाराज तो स्वामि कैवल्यदाता | वृथा वाहणे देहसंसारचिंता ||78||

मना पावना भावना राघवाची | धरी अंतरी सोडि चिंता भवाची |
भवाची जिवा मानवा भूलि ठेली | नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ||79||

धरा श्रीवरा त्या हरा अम्तराते | तरा दुस्तरा त्या परा सागराते |
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते | करा नीकरा त्या खरा मत्सराते ||80||

– श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..