१९३७ साली प्रदर्शित झालेल्या प्रभातच्या कुंकू या चित्रपटातील हे गाणे स्वत: मास्टर परशुराम यांनी गायले. या गाण्याचे संगीत होतं केशवराव भोळे यांचं. हे सुप्रसिध्द गाणे लिहिले होते ‘प्रभात’कालीन उत्कृष्ट गीतकार, कवी, उत्तम लेखक, अभ्यासक व यशस्वी चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांनी. प्रभात सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीला दिलेले हे सोनेरी दिवसच म्हणावे लागतील.
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची
झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची
—
Leave a Reply