मन आहे भ्रमर भ्रमर स्थिरावत नाही एकाच कळीवर
कळीचे होता फुल अचानक होते सैरभैर …
चोहीकडे भटकते मन सुंदर नवीन कळीच्या शोधात
भेटतेच सहजी ती एकटी उभी त्याला रस्त्यात …
टाकतो पाश मन प्रेमाचाच गोड गोड बोलून
भूलातच ती बोलण्या घेतो मिठीत तिला भरून ..
प्रेम वर्षावात कळी मनाच्या मग ती निघता न्हावून
व्यक्त करते तिचे प्रेम आनंदाने ती नाचून …
होताच कळी ती ही प्रेमात मनाच्या फूल फुलून
मन जातोच सोडून नव्या कळीचा हात धरून …
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply