नवीन लेखन...

मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विकासातील योगदान

 १८ मे हा मराठवाडा कृषी विद्यापीठाचा वर्धापन दिन. १९७२ साली परभणी येथे या विद्यापीठाची स्‍थापना झाली. मराठवाड्यातील शेती व अनुषंगिक व्‍यवसायातील समस्‍या दूर करण्‍यासाठी संशोधन करणे, कृषी खाते तसेच इतर विकास खात्‍यातील विस्‍तार कार्यकर्त्‍यांना प्रशिक्षण देऊन पथदर्शक विस्‍तार कार्य करणे आणि कृषी विकासासाठी प्रशिक्षीत मनुष्‍यबळ निर्माण करणे ही तीन प्रमुख उद्दिष्‍टे विद्यापीठ स्‍थापनेमागे होती.महाराष्‍ट्र राज्‍याने कृषी व औद्योगिक विकासावर भर देण्‍याचे धोरण प्रारंभापासून ठेवले. जलसिंचनाची सोय, धरणांची उभारणी, खतांची पुरेशी उपलब्‍धता, दर्जेदार बियाणांचा पुरवठा, कमी व्‍याजदराने वेळेत कर्ज पुरवठा, कृषी उत्‍पादनाच्‍या विक्रीसाठी सोय, शेतक-यांच्‍या मालाला हमी भाव आदी बाबींमुळे राज्‍यातील कृषी क्षेत्राची दिवसेंदिवस प्रगती झालेली दिसून येते. परभणी येथे १९५६ मध्‍ये कृषी महाविद्यालयाची स्‍थापना झाली. कृषी क्षेत्रातील पदवीच्‍या कृषी विस्‍तार या विषयासाठी कृषी विस्‍तार विभागाची स्‍थापना झाली. कृषी विस्‍तार कार्यासाठी १९५८ मध्‍ये परभणी तालुक्‍यात विस्‍तार शिक्षण गट स्‍थापन करण्‍यात आला. यामध्‍ये १० गावांचा समावेश करण्‍यात आला होता. या गावांमधील शेतक-यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्‍यासाठी पीक प्रात्‍यक्षिके, प्रक्षेत्र भेटी, शेतकरी मेळावे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येत असे. त्‍यानंतर १८ मे १९७२ मध्‍ये मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्‍थापना झाली. १९७५ मध्‍ये कृषी विद्यापीठांतर्गत विस्‍तार शिक्षण योजना सुरु झाली. १९७६ मध्‍ये राष्‍ट्रीय पीक प्रात्‍यक्षिक योजना अस्‍तित्‍वात आली. या योजनेखाली मराठवाड्यातील खरीप व रबीच्‍या पिकाची पीक प्रात्‍यक्षिके घेण्‍यात आली.मराठवाडयातील सर्व जिल्‍ह्
ां ा त्‍यामुळे फायदा झाला. १९८१ मध्‍ये विस्‍तार शिक्षण अधिक सुदृढ करण्‍यासाठी प्रशिक्षण व भेट योजनेची सुरुवात झाली. त्‍यानुसार परभणीला विस्‍तार शिक्षण संचालनालयाची स्‍थापना झाली. परभणी, अंबाजोगाई, औरंगाबाद व लातूर येथे विस्‍तार कृषी विद्यावेत्‍ता कार्यरत आहेत. विस्‍तार शिक्षण कार्यक्रमाखाली शेतकरी मेळावे, परिसंवाद, शेतकरी प्रशिक्षण, गटचर्चा, शेतकरी-शास्‍त्रज्ञ मंच, प्रक्षेत्र भेटी, कृषी प्रदर्शन तसेच

प्रसार माध्‍यमांद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रसार असे विविध उपक्रम राबविण्‍यात येतात. परभणीच्‍या विस्‍तार शिक्षण योजना, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र याशिवाय परभणी, लातूर, अंबाजोगाई व औरंगाबाद येथील विभागीय कृषी विस्‍तार शिक्षण केंद्र तसेच औरंगाबाद, तुळजापूर व खामगावच्‍या कृषी विज्ञान केंद्राद्वारे विस्‍तार शिक्षणाचे कार्य केले जाते.विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवण्‍यासाठी दरवर्षी ३ जानेवारीस सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त महिला मेळावा, १८ मे रोजी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्‍त खरीप शेतकरी मेळावा आणि १७ सप्‍टेबर रोजी मराठवाडा मुक्‍ती संग्रामदिनानिमित्‍त रबी शेतकरी मेळावा आयोजित केला जातो. याशिवाय कृषी दैनंदिनी, कृषी दिनदर्शिका, इतर माहिती पुस्‍तिका तसेच शेतीभाती हे मासिक प्रसिध्‍द केले जाते.आकाशवाणी, दूरदर्शन, स्‍थानिक केबल या प्रसारमाध्‍यमांप्रमाणेच इंटरनेट, मोबाईल या आधुनिक माध्‍यमांचा वापर विद्यापीठाकडून केला जातो. किसान कॉल सेंटर, एसएमएस (लघु संदेश सेवा), टचस्‍क्रीन (स्‍पर्शपटल) आणि कृषी माहिती वाहिनी या द्वारे हे कार्य केले जाते. परभणी, औरंगाबाद आणि लातूर येथील विभागीय कृषी विस्‍तार शिक्षण केंद्रातून कृषी माहिती वाहिनीची सेवा पुरविली जाते. परभणी येथे दर शुक्रवारी सकाळी ९ ते ११ या व
ळे त ०२४५२-२२९००० या दूरध्‍वनी क्रमांकावर वेगवेगळे कृषीविषय तज्ञ उपलब्‍ध असतात. या वेळेत शेतक-यांनी विचारलेल्‍या कृषी विषयक प्रश्‍नांना दूरध्‍वनीवरुन उत्‍तरे दिली जातात. लातूर येथे ०२३८२- २५९८८८ या दूरध्‍वनी क्रमांकावर दर बुधवारी सकाळी ९ ते ११ तर औरंगाबाद येथे ०२४०-२३७६५८८ या दूरध्‍वनी क्रमांकावर दर मंगळवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत संपर्क साधल्‍यास कृषी विषयक प्रश्‍नांची उत्‍तरे दिली जातात.विद्यापीठ परिसरात २६ हेक्‍टर क्षेत्रावर खरीप व रबी हंगामात पीक प्रात्‍यक्षिकाचे (क्रॉप कॅफेटेरिया) आयोजन करण्‍यात येते. येथे एकाच ठिकाणी विविध पिकांचे वाण पहावयास मिळू शकते. विद्यापीठाने शिक्षणाच्‍या क्षेत्रातही नेत्रदिपक कामगिरी केलेली आहे. सध्‍या विद्यापीठात विविध ७ शाखांच्‍या ११ घटक शासकीय व २९ संलग्‍न (खाजगी) महाविद्यालयातून कृषी व अनुषंगिक शाखांचे शिक्षण दिले जाते. यामध्‍ये कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्‍नतंत्रज्ञान, उद्यानविद्या, गृहविज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन या शैक्षणिक शाखांचा समावेश आहे. सर्व शाखांमध्‍ये पदवी व पदव्‍युत्‍तर शिक्षणाच्‍या सुविधा आहेत. पदवी अभ्‍यासक्रमासाठी घटक महाविद्यालयात ७३२, संलग्‍न महाविद्यालयात १ हजार ४६०, पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठी ३३८ तर आचार्य विद्यार्थ्‍यांची प्रवेश क्षमता २९ इतकी आहे. या सर्व शाखांमधून १३ हजार ७६६ विद्यार्थ्‍यांनी पदवी, ४ हजार ४५८ विद्यार्थ्‍यांनी पदव्‍युत्‍तर तर ५३५ विद्यार्थ्‍यांनी आचार्य पदवी अभ्‍यासक्रम पूर्ण केला आहे. माध्‍यमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्‍यांना कृषी पदविका शिक्षणाची सोय ९ घटक व ५३ खाजगी कृषी तंत्र विद्यालयातून उपलब्‍ध आहे. आतापर्यंत ३३ हजार ६४२ विद्यार्थ्‍यांनी कृषी पदविका व माळी प्रशिक्षण हा अभ्‍यासक्रम
ूर ण केला आहे. विद्यापीठाने प्‍लेसमेंट सेलची निर्मिती केली असून कॅम्‍पस इंटरव्‍ह्यूद्वारे पदवीधारकांना सेवेच्‍या संधी उपलब्‍ध होत आहेत. विद्यापीठाकडे एकूण ३ हजार ५५५.४० हेक्‍टर जमीन असून त्‍यापैकी शिक्षणाकरिता ५६९.४६ हेक्‍टर, संशोधनासाठी २ हजार ९२४.९४ हेक्‍टर व विस्‍तार शिक्षणासाठी ६० हेक्‍टर जमिनीचा उपयोग केला जातो. शिक्षण कार्यासाठी ३३४, संशोधनासाठी १५६, विस्‍तार शिक्षणासाठी २९ व इतर प्रवर्गामध्‍ये २ हजार २७५ असे एकूण २ हजार ७९४ मंजूर मनुष्‍यबळ आहे.विद्यापीठ परिसरात मध्‍यवर्ती ग्रंथालयाची सुसज्‍ज इमारत आहे. विद्यार्थ्‍यांसाठी ६.६८ क्षेत्रावर भव्‍य क्रीडा संकूल उभारण्‍यात आले आहे. ३० विद्यार्थ्‍यांसाठी आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे वस्‍तीगृह, पदवी व पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमातील मुलां-मुलींसाठी स्‍वतंत्र वस्‍तीगृहे तसेच व्‍यायामशाळा, प्रयोगशाळा, व्‍याख्‍यानगृह अशा सुविधा उपलब्‍ध आहेत. २०० शेतक-यांच्‍या निवास सोयीसाठी शेतकरी भवन व शेतकरी निवास बांधण्‍यात आलेले आहे. शेतकरी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू असून शेती केवळ उपजीविकेचे साधन न राहता सर्वांगीण विकासाचे साधन व्‍हावे यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. पावसाचे अनियमित प्रमाण, जागतिक तापमान वाढ, शेतजमिनीत होणार घट,

जमिनीची नापिकी या समस्‍यांवर मात करण्‍याच्‍या दृष्‍टिने संशोधन होत आहे. शेतीशास्‍त्रात झालेल्‍या बदलांच्‍या अनुषंगाने विविध प्रकारचे संशोधन कार्य विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात ९ संशोधन केंद्र, ८ उपकेंद्र व २९ योजनेंमार्फत संशोधन करण्‍यात येते. विद्यापीठाने विविध तृणधान्‍य, कडधान्‍य, गळीत धान्‍य, कापूस तसेच भाजीपाला, फळे, फुले आणि चारा पिकांचे अनेक वाण विकसित केले आहेत. आतापर्यंत विद्यापीठाने विविध पिकांच्‍या ११५ सुधारित
व स ंकरित वाणांची निर्मिती केली आहे. त्‍यामध्‍ये ज्‍वारीच्‍या परभणी श्‍वेता, परभणी मोती, परभणी साईनाथ, बाजरीच्‍या पीपीसी-६, एबीपीसी-४-३, एएचबी-१६६, तुरीच्‍या बीएसएमआर-७३६, बीएसएमआर-८५३, बीडीएन-७०८, सोयाबीनच्‍या एमएयूएस-७१, एमएयूएस-८१, एमएयूएस-१५८, कापसाच्‍या एनएचएच-४४, विनायक, तुराब, एनएच-६१५, भाताच्‍या पराग, आविष्‍कार, मुगाच्‍या बीएम-२००३-२, बीएम-२००२-१, बीएमआर-१४५, , भुईमुगाच्‍या एजलीएन-१, कारळाची पीएनएस-६, करडईच्‍या पीबीएनएस-१२, पीबीएनएस-४०, लिंबाची प्रमालिनी, विक्रम, चिंचेची प्रतिष्‍ठान, कवठाची एलोरा या वाणांचा समावेश आहे. मृद व जलसंधारण, विविध पिके आणि पीक लागवड पध्‍दती, खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन, आंतरमशागत पध्‍दती, कीड, रोग, आणि तणाचे एकात्‍मिक व्‍यवस्‍थापन, सुधारित अवजारे, हरितगृहातील शेती, प्रक्रिया आणि विपणन या विषयी संशोधन करुन ५८१ शिफारशी विद्यापीठाने प्रसारित केल्‍या आहेत. पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय, शेळीपालन, कुक्‍कुटपालन यावरही संशोधन झालेले आहे. देवणी आणि होलस्‍टीन फ्रिजन यांच्‍या संकरातून होलदेव ही जात तयार करण्‍यात आली आहे. या गाईपासून प्रतिदिन २९ लिटर एवढे अधिकतम दूध उत्‍पादन मिळाले आहे. विद्यापीठातील संशोधन कार्यास २ आंतरराष्‍ट्रीय, २३ राष्‍ट्रीय व २० राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार मिळाले आहेत.विद्यापीठातील उति संवर्धन प्रयोगशाळेत केळी या पिकाच्‍या उति संवर्धित रोपांची निर्मिती करण्‍यात येत आहे. गाजरगवत खाणा-या मेक्‍सिकन भुंग्‍यांचे उत्‍पादन व विक्री करण्‍यात येते. त्‍यामुळे गाजरगवताचे जैविक नियंत्रण करण्‍यात यश मिळाले आहे. औरंगाबादला उच्‍च तंत्रज्ञानावार आधारित पुष्‍पसंवर्धन केंद्राची उभारणी करण्‍यात आली असून दूरच्‍या बाजारपेठेत फुलांची निर्यात करण्‍यात येत आहे. कृषी अन्‍नतंत्र महाविद्यालयात करडईच्‍
या ुलांच्‍या पाकळयांपासून हर्बल टी तसेच विविध फळांवर प्रक्रिया करुन रस निर्मिती करण्‍याचे तंत्र विकसित केले आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुधारित वाण व पूरक तंत्रज्ञान देऊन अन्‍नधान्‍य उत्‍पादन वाढीच्‍या कार्यात मौलिक योगदान दिले आहे

  • राजेंद्र सरग
  • — राजेंद्र सरग

    1 Comment on मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विकासातील योगदान

    1. मा. सर, आपण लिहलेला लेखा फार छान आणि उपयुक्त आहे.
      कृपया मी नमूद केलेल्या मेल वर हा लेख पाठवावा, हि नम्र विनंती.

    Leave a Reply

    Your email address will not be published.


    *


    महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

    गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

    गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

    राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

    अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

    अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

    अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

    विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

    विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

    अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

    अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

    अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

    अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

    Loading…

    error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..