कुठल्याही उद्योग किंवा व्यवसायात यशाचं शिखर गाठण्यासाठी लागणाऱ्या शिडीच्या पहिल्याच पायरीला ‘बिझनेस नेटवर्किंग’ म्हणतात! आज ‘बिझिनेस नेटवर्किंग’ हा मार्केटिंगचा एक भाग नसून तो बिझनेस डेव्हलपमेंटचाच एक मुख्य भाग बनला आहे. ‘बिझनेस नेटवर्किंग’ ही संकल्पना आपल्या देशात पूर्वीपासून होती पण साधारणपणे गेल्या दशकात या संकल्पनेला लोकमान्यता मिळाली व मोठय़ा प्रमाणात रुजत गेली. खास करून मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी ‘बिझनेस नेटवर्किंग’ ही संकल्पना अधिक गंभीरपणे घ्यायला हवी. कारण गुजराथी, कच्छी, मारवाडी, सिंधी व इतर समाजांत मोठय़ा प्रमाणात व्यापारी मंडळी फार पूर्वीपासून एकत्र आहेत व एकमेकांना प्रत्येक बाबतीत ते मदत करत असतात. त्या मानाने मराठी समाजात उद्योजकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी झालेले नाहीत ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. पण सुदैवाने मराठी समाजातील आजच्या पिढीच्या उद्योजकांत आणि आघाडीच्या प्रश्नेफेशनल्समध्ये मोठय़ा प्रमाणात नेटवर्किंगचे ज्ञान आहे आणि विविध स्तरांवर वेगवेगळ्या माध्यमांतून मराठी माणसं एकत्र येऊन काम करताना दिसतात.बिझनेस नेटवर्किंग म्हणजे फक्त एका विशिष्ट जातीच्या किंवा एक भाषा बोलणाऱ्या लोकांनीच एकत्र येऊन काम करायला पाहिजे असं मुळीच नाही. पण स्वभाषिक लोक सुरुवातीला सहजपणे एकत्र येतात असा अनुभव आहे. खरं तर आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात भाषा, जात, प्रदेश आणि देशाच्या भिंतीसुद्धा केव्हाच कोसळून पडलेल्या आहेत. आज फक्त मेरीट हेच एक चलन सर्व क्षेत्रांत चालतं. म्हणून आपण काल कुठे चुकलो असू यावर विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आज आपल्या समोर काय आहे, त्याचा आपण पुरेपूर वापर करतो का? याचा विचार आपल्या मराठी समाजात मोठय़ा प्रमाणात होणं गरजेचं आहे! मी तर म्हणेन की माणसं जे
्हा एखाद्या भाषेचा किंवा जातीचा आधार घेऊन एकत्र येतात तेव्हा नकळतपणे ती कुठल्यातरी एका विषयाच्या किंवा विशिष्ट मर्यादेच्या
चौकटीत बंदिस्त होत जातात. बऱ्याच
वेळेला मग व्यवहारापेक्षा भावनात्मक प्रश्नांना महत्त्व येत जातं आणि नेमका गोंधळ तिथेच उडतो असा माझा अनुभव आहे.बिझनेस नेटवर्किंग म्हणजे आपली उत्पादने विकण्याचे मार्केट नाही किंवा आपण काही तरी विकत घेतलेच पाहिजे असा नियम नाही. बिझनेस नेटवर्किंग म्हणजे कुणाशी तरी पार्टनरशिपचा करार करणे नाही किंवा कर्ज मिळविणेही नाही. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर पैशाचा किंवा कुठला तरी व्यवहार झाला पाहिजे असा नियमही नाही. मग ‘बिझनेस नेटवर्किंग’ ही संकल्पना म्हणजे नेमकी काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘बिझनेस नेटवर्किंग’ म्हणजे आपल्या उद्योगासंबंधित विषयांत काम करणाऱ्या आणि एकूणच उद्योगविश्वाशी निगडित असणाऱ्या जास्तीतजास्त लोकांशी आपला चांगल्या प्रकारचा परिचय करून घेणे असा आहे. आपण एखादं चांगलं पुस्तकं वाचतो, आपल्याला ते आवडतं म्हणून आपण ते संग्रही ठेवतो, यातील खास पानं दुमडून ठेवतो, इतरांना वाचायला सांगतो आणि वेळोवेळी आपण ती पुन्हा पुन्हा वाचून त्याचं अध्ययन करतो, प्रत्येक वेळी आपण नव्याने काहीतरी शिकायला त्याची मदत घेत असतो. अगदी तसंच काहीसं नेटवर्किंगबाबत म्हणता येईल. प्रत्येक व्यक्तीकडे त्याच्या क्षेत्रातील ज्ञान असतं, अनुभव असतात, इतर लोकांची माहिती असते ती मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. पुस्तकांचा परिचय जसा नुसता कव्हर पेजवरून होत नाही तसंच माणसांची ओळखसुद्धा त्यांच्या ‘व्हिजिटिंग कार्डस्’वरून किंवा टेलिफोन नंबरची माहिती मिळवून होत नाही. स्वत:विषयीची माहिती सांगून किंवा इतरांची माहिती ऐकून सुरुवातीचं बोलणं जरी सुरू होत असलं तरी अर्थपूर्ण ‘संवाद’ होतो
असं नाही. तोंडओळख करणं सोप आहे, पण नीटपणे माणसं ओळखायला आणि जोडायला खास प्रयत्न करावे लागतात. आपल्याला कुठल्याही व्यक्तीशी प्रेमाने, हक्काने किंवा अधिकाराने बोलता येणं महत्त्वाचं आहे. याबाबत गेल्या काही वर्षाच्या माझ्या अनुभवावरून मी सांगू शकतो की मराठी व्यावसायिकांत आज खूपच जागरूकता आलेली आहे. लोक पुढे येऊन इतरांशी आस्थेने बोलतात, माहिती मिळवतात, प्रेमाने संवाद साधतात, खास करून तरुण मुलं मनापासून इतरांचं कौतुक करतात आणि एकमेकांना प्रश्नेत्साहन देताना दिसतात ही फारच आशादायक गोष्ट आहे. हे वाढायला हवं, सर्व क्षेत्रात आणि सर्व स्तरावर ते व्हायला हवं. इथे विशेष करून मराठी मीडियाचे आभार मानायलाच पाहिजे. आज जवळजवळ प्रत्येक मराठी वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेल्सकडून आपल्या समाजात एकूणच उद्योजकता वाढावी म्हणून खास प्रयत्न होताना दिसतात.‘नेटवर्क’ म्हणजे ‘लोकसंग्रह’ आणि ‘बिझनेस नेटवर्क’ म्हणजे उद्योगाशी संबंधित लोकांचा संग्रह. सुरुवातीला नुसतं बिझनेस नेटवर्क करता येणं शक्य नाही कारण जोपर्यंत आपण आपला लोकसंग्रह वाढविणार नाही तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की कोण आपल्या उद्योगाशी संबंधित आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपला लोकसंग्रह वाढवणे क्रमप्रश्नप्त आहे! लोकसंग्रह कसा वाढतो? आपले कोळी बांधव जसे मासे पकडायला जाळी तयार करतात तसा हा प्रकार आहे. नायलॉनच्या धाग्याला एक एक करून गाठी मारत जाळी तयार होत असते. त्याच प्रकारे जसजशी माणसं भेटत जातात, त्यांच्याशी आपला संवाद होत जातो, तसतसा आपला लोकसंग्रह वाढत जातो. जाळं विणणारा कोळी कितीही हुशार असला, मेहनती असला तरी संपूर्ण जाळी एका दिवसात तयार करू शकत नाही आणि विणकाम हा प्रकार कितीही कंटाळवाणा वाटला तरी तो करावाच लागतो कारण जाळी विणल्याशिवाय समुद्रात मासे पकडणे शक्य नाही. त्याचप्रमाण
आपण एका दिवसात १०० लोकांना जरी भेटलो तरी खऱ्या अर्थाने त्यांच्याशी संवाद साधायला, त्यांच्याबद्दल उपयुक्त माहिती मिळवायला वेळ लागतोच.लोकसंग्रहाविषयी विचार करण्याआधी, आपल्या भोवती असलेल्या लोकांविषयी आपण जरा विचार करू या- १) आपल्या घरची माणसं आणि आपले सख्खे नातेवाईक हा आपला पहिला हक्काचा लोकसंग्रह. २) आपले शेजारी, शाळा आणि कॉलेजातील मित्र, आपल्यासोबत लहानपणी खेळणारे सवंगडी, हा दुसरा
प्रेमाचा लोकसंग्रह. आपल्या नातेवाईक किंवा मित्रांकडून अपेक्षा करताना त्यांना तुमच्या
उद्योगाविषयी ज्ञान किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला अपेक्षाभंग होऊ शकतो. ३) आपले कर्मचारी, पार्टनर्स, ग्राहक, वितरक, गुंतवणूकदार, विविध सल्लागार आणि आपल्या उद्योगाशी संबंधित सगळी माणसं हा तिसरा आणि महत्त्वाचा लोकसंग्रह. ही माणसं आपल्याशी व्यवहारामुळे जरी जोडली गेलेली असली तरी पुष्कळ वेळा हीच माणसं आपल्याला आपल्या रक्ताच्या नातेवाईकांपेक्षाही आणि मित्रांपेक्षा जास्त मदत करतात असा अनुभव आपल्याला येतो. ४) आपण कुठल्याशा क्लबचे मेंबर असतो, एखाद्या जातीच्या किंवा समाजाच्या शाखा असतात, आपण सभारंभांना जातो, भाषणाला जातो, पाटर्य़ाना हजेरी लावतो, पर्यटनाला ग्रुप्सबरोबर जातो, अशा विविध ठिकाणी माणसं भेटतात व आपला लोकसंग्रह वाढत जातो आणि शेवटी ५) आज इंटरनेटच्या युगात ‘लिंक्डईन’ ‘फेस-बुक’सारख्या नेटवर्किंगच्या खास वेबसाइट्सच उपलब्ध आहेत. इंटरनेटवरून आज आपण पूर्णपणे अनोळखी लोकांशीसुद्धा ओळख करून घेऊ शकतो हे आजच्या युगातंल एक मोठ वरदानच म्हणायला काही हरकत नाही आणि मला वाटतं की मराठी तरुण उद्योजकांनी याचा पुरेपूर उपयोग विविध क्षेत्रांतली माणसं शोधण्यात आणि जोडण्यात करायला पाहिजे.कुठलाही उद्योग सुरू करताना किंवा नंतर लागण
ऱ्या भांडवलापासून, परदेशी गुंतवणूक, टेक्नॉलॉजी, मार्केटिंग, प्रश्नॅडक्ट्स, ब्रॅण्ड्स, अॅडव्हर्टायझिंग, ह्यूमन रिसोर्स, विविध सहकाराचे करार किंवा इतर कुठल्याही टेक्निकल गोष्टींची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्याला त्या त्या क्षेत्रातील जाणकार लोकांची माहिती ही असायलाच हवी, इतरांच्या अनुभवावरून शिकण्यासाठी त्यांच्याशी बोलावंच लागेल आणि गरज पडल्यास मदतही घ्यावीच लागणार. आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये असू किंवा सव्र्हिस सेक्टरमध्ये, आपलं ‘उत्पादन’ योग्यरीतीने बनवण्यापासून ग्राहकांपर्यंत चांगल्या मार्केटिंगद्वारे नेईपर्यंतचा प्रवास हा शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला पाहिजे, तरच तो व्यवसाय मोठा होत जातो. ते करण्यासाठीचे ज्ञान अनुभवी लोकांकडून मिळवणे गरजेचे आहे. आता प्रश्न असा आहे की, अशी तज्ज्ञ, जाणकार आणि अनुभवी माणसं मिळणार कुठून ? म्हणूनच लोकसंग्रह दांडगा असणं फार गरजेचं आहे.आपल्या मित्र आणि नातेवाईकांशिवाय आपण इतर किती लोकांची आठवणीने विचारपूस करतो? साधे दिवाळीचे किंवा नववर्षाचे कार्ड आपण किती लोकांना अपेक्षा न ठेवता पाठवतो? इतरांशी बोलतानाही आपला बराचसा वेळ हा आपण काय आहोत आणि आपल्याला काय पाहिजे हे सांगण्यावर खर्च करतो. इतरांकडून अपेक्षा ठेवणे मुळीच चुकीचे नाही, पण ती पूर्ण झाली नाही तर निराश होता कामा नये. लोकसंग्रह हा आपोआप वाढत नाही तर तो एका जाणीवेने वाढवावा लागतो. लोकसंग्रह वाढवणे ही एक कला आहे आणि त्याचे नियम तसे अगदी सोपे आहेत. काही लोक मुळातच बोलके असतात त्यांना ही कला चांगलं जमते. पण चांगला बोलता आलंच पाहिजे असा काही नियम नाही, गरज पडल्यास तुम्ही इतरांच्या पहिल्या हाकेला नि:स्वार्थपणे धावून जाणे महत्त्वाचे आहे. मदत करते वेळी प्रश्नमाणिक असणे फार फार महत्त्वाचे आहे. लोकसंग्रह वाढवण्याचा प्रवास स
रू करताना वरील दिलेल्या एक ते चार वर्गात मोडणाऱ्या लोकांची एक यादी तयार करा आणि त्यांची संपूर्ण माहिती गोळा करून विचारपूर्वक आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तींची एक छोटी यादी करा आणि त्यांना वरचेवर भेटत चला, तुमच्या व त्यांच्या आवडत्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा करा; गप्पा करतेवेळी त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि जमेल तितकी त्यांना मदत करा. तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवरसुद्धा चर्चा करा. अगदी सहजपणे तुमचा इतरांशी बोलण्याचा हुरूप वाढत जाईल आणि तुम्ही तुमच्या नकळतपणे लोकांचे होऊन जाल! शक्य तितके बिझनेस नेटवर्किंगमध्ये सुरुवातीलाच कुठल्याही वैयक्तिक गोष्टींची चर्चा करणे टाळले पाहिजे, चर्चा ही औपचारिक असेल तितकी चांगली. दुसरे ‘चर्चा’ म्हणजे आपले मत मांडणे नव्हे! म्हणजे आपल्या बोलण्याच्या दोन पटीने आपण इतरांच ऐकावं असे अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा आपण आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तींशीसुद्धा बोलायचा प्रयत्न करतो, संवादाचं रूपांतर वादात होत जातं आणि उगाच चिडतो, भांडतो आणि आपली पॉझिटिव्ह एनर्जी खर्च करतो! आपल्याला आपलाच राग येत जातो आणि वाटते कुणाशीही बोलूच नये. नेटवर्किंग थांबतं! नेमकं हेच टाळता आलं पाहिजे कारण ‘नेटवर्किंग’ या शब्दातच ‘वर्क’ करत राहणं अपेक्षित आहे!
— श्री.रामचंद्र कृष्णा कदम उर्फ दादा
Leave a Reply