नवीन लेखन...

मराठी भाषा दिन……

आज “मराठी भाषा दिन”. मराठीचा गजर आणि जागर करण्याचा दिवस.

मराठी ही जगातली १९ व्या क्रमांकाची भाषा आहे असे मानले जाते…..

मराठी भाषा भारतात ४ थ्या क्रमांकाची जास्तीत जास्त बोलली जाणारी भाषा आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत…..

विकीपिडियावर मराठीत केवळ ३८,००० लेख आहेत.

कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आजचा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो. सरकार आणि खाजगी संस्थांतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन होते. पुरस्कार सोहोळे होतात. मराठीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कंबर कसून प्रयत्न करण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. बरंच काही बोललं जातं. मात्र आजचा दिवस पालटल्यावर यातल्या निम्म्याहून जास्त गोष्टी विस्मरणात जातात.

या दिनाच्या निमित्ताने शासनातर्फे राज्य वाङ्मय पुरस्कार, विंदा जीवन गौरव आणि श्री. पु. भागवत पुरस्कारांचे वितरण एका विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २७ मराठी संकेतस्थळांचे उदघाटन करण्यात येणार आहे. मराठी विश्वकोशाच्या खंड १७ ते १९ चे इंटरनेटवरील प्रकाशनही आज होणार आहे. साहित्य संस्कृती मंडळ तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या बोलक्या पुस्तकांचेही उदघाटनसुद्धा होणार आहे.

सोशल नेटवर्किंग साइट्सवर मराठीमध्ये टायपिंग करणे आता सोपे झाले. मराठी इंटरनेटवर सहजपणे वावरू लागली . इंटरनेटवरील मराठीचा वापर वर्षभरात बराच वाढल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र एकूणच मराठीतल्या वेबसाईटसच्या संख्येकडे नजर टाकली तर काही फार आशादायक चित्र दिसत नाही. इंग्रजीच्या तोडीने मराठी वेबसाईटस उब्या रहाण्यासाठी अजून अनेक वर्षे वाट बघायला लागेल.

गेल्या वर्षभरात इंटरनेटचा वापर केवळ कम्प्युटरपुरता मर्यादित न राहता तो टॅबलेट आणि मोबाइलवरही मोठ्या प्रमाणात वाढला . या गॅजेट्समध्येही मराठीचा वापर करणे शक्य झाल्याने फेसबुक , ट्विटरवरही मराठीचा वापर होऊ लागला. अँड्रॉइडमध्येही मराठी ऑपरेटिंगचा पर्याय उपलब्ध झाला. मराठीमध्ये टाइप करता आणि वाचता येणारे‌ अनेक डिव्हाइस बाजारात आले.

हे सगळे होत असताना आजच, अगदी मराठी भाषा दिनाच्या मुहुर्तावर एक बातमी वाचली आणि मराठीची उपेक्षा अजूनही होत असल्याची खात्री पटली. ब्लॅकबेरी या आघाडीच्या स्मार्टफोनची नवी आवृत्ती येतेय. त्यात ७ भारतीय भाषांमध्ये काम करण्याची सोय आहे….. या ७ भारतीय भाषांमध्ये मराठीचा समावेश नाही ! मराठीचा समावेश नंतर होईल असे ब्लॅकबेरीच्या प्रवक्त्याने सांगितले खरे पण ते म्हणजे केवळ समजूत घालण्यासारखेच.

आता मराठीच्या प्रसार, प्रचार, संवर्धन वगैरेसाठी कंबर कसणारे काय भूमिका घेतात बघूया….

— मराठीसृष्टी व्यवस्थापन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..