योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन ।योऽपा करोत तं प्रवरम् मुनीनां पत॰जलीं प्रा॰जलिरानतोऽस्मि।।
”ज्याला एखाद्या गोष्टीची सर्वांत जास्त गरज प्रकर्षानं असावी आणि त्याचचं त्या गोष्टीकडे सातत्यानं अक्षम्य दुर्लक्ष व्हावं, असं काहीसं आम मराठीमाणसाचं ’योगविद्ये‘बाबत घडत आलयं!“ मुळात स्चच्छंद गावरान-कलंदर वृत्ती मराठी हाडापेरात भिनलेली असल्यामुळे, जीवनाच्या डोहात थोडं गांभिर्यानं डोकावयाची सर्वसाधारणपणे तयारी नसणं, त्यात कडव्या चिकाटीचा अभाव आणि आधुनिक काळाच्या संदर्भात, काहीशी अतिरेकाकडे झुकणारी उत्सवप्रियता, या सगळयांचा एकत्रित परिणाम म्हणून बहुसंख्य मराठीजनांनी योगविद्येचा अंगिकार, अंगावर पडलेल्या पालीसारखा झटकून टाकलेला!
आधुनिक जीवनशैलीचे अनिवार्य ताणतणाव, संसाधनांच्या कमतरतेमुळे व सदोष मानसिकतेमुळे नव्या युगाला सामोरं जाताना मराठी बहुजनांची उडणारी तारांबळ – होणारी कुचंबणा व कोंडमारा, उत्तरोत्तर कमी होत गेलेले शारीरिक श्रम व निःसत्त्व आहार, प्रदूषणाचं धोकादायकरित्या वाढत चाललेलं प्रमाण, क्रमाक्रमानं घसरत चाललेलं राहणीमान, तसेच वैफल्यापोटी वाढत चाललेली व्यसनाधीनता, यामुळे बैठया’नगरांमध्ये‘ राहणार्या बहुसंख्य मराठीजनतेचं आरोग्य मोठयाप्रमाणावर बिघडलेलं! तर दुसरीकडे ’टॉवर‘-संस्कृतित ’वावर‘ असणार्या अभिजन मराठीमंडळींमध्ये, अत्याधुनिक जीवनशैलीमुळे व टोकाच्या ’करियरिस्ट्‘ मनोवृत्तीमुळे कमालीचे वाढत जाणारे गुंतागुंतीचे ताणतणाव, शारीरिक श्रमांचा जवळजवळ पूर्ण अभाव, ज्याला ’आहारकोंदा‘ असं पूर्वीची वयोवृध्द मंडळी म्हणायची, एवढा फाजील अतिरिक्त कॅलरीयुक्त व ’कर्करोगकारक‘ (कार्सिनोजेनिक किंवा अॅाक्सिडं्ट्स्युक्त) तंतूमय नसलेला आहार (नुकत्याच अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार सारख्याच वजनाच्या व समान कॅलरीयुक्त पूर्ण शिजवलेल्या आहाराव्दारे, तुलनेनं कच्च्या आहारापेक्षा वा किंचित शिजवलेल्या आहारापेक्षा शरीरात कितीतरी जास्त ’कॅलरीज्‘ शोषल्या जातात, हे सप्रमाण सिध्द झालयं!), चंगळवाद, व्यसनाधिनता याचा सर्वंकष परिणाम म्हणून मोठमोठया चौरसफूटाच्या प्रत्येक आलिशान फ्लॅटमधून मधुमेह, रक्तदाब, दमा, सांधेदुखी यांसारख्या मनोकायिक गंभीर आजारांनी मांडलेलं ठाणं – घातलेलं थैमान, या काळजी व ंचंतन करायला लावणार्या बाबी आहेत.
पूर्वी खास उच्चभ्रूवर्गाचे समजले जाणारे हृदयरोग व मधुमेहासारखे आजार, शहरांच्या गोरगरीब वाडयावस्त्यांमधुनच नव्हेत, तर गावोगावच्या पाडयांमधुनदेखील सर्रास आढळतायतं, ही समाजधुरीणांसाठी धक्कादायक बाब आहे! या सर्वांचा सरळ अर्थ एकच, की कुठेतरी – काहीतरी भयंकर चुकतयं! कुणाला थांबायला – थबकायला – विचार करायला वेळ व तशी इच्छा नाही. जीवनशैलीत मुलभूत स्वरूपाचे आवश्यक बदल तातडीनं करण्याइतपत लवचिकता, आमची मराठमोळी मंडळी दाखवणार आहेत का, हाच सध्याचा आपल्यापुढील मोठा प्र९न आहे!ं
’यमःवैद्यराज सहोदराः‘ या उक्तिप्रमाणे प्रचंड महागडी होत चाललेली आधुनिक वैद्यकिय उपचारपध्दती – त्यात मोठयाप्रमाणात झालेला अनितीचा शिरकाव, याचा एकत्रित विचार करता, श्रीमंतांना दिर्घकालीन वैद्यकिय उपचार ’परवडणारा‘ असला, तरी नक्कीच ’आवडणारा‘ नसतो आणि गोरगरीबांना तर तो बिलकुल ’परवडणारा‘ नसतो! या पार्श्वभूमिवर ’योगविद्ये‘चा सर्वोत्तम गुण म्हणजे आत्यंतिक गरीबीत-विपन्नावस्थेतही, कुठलाही माणूस ’योगविद्या‘ अंगिकारून एक ’पै’ सुध्दा खर्च ’न‘ करता, सदैव निरोगी व आनंदी राहू शकतो!
सध्या घरोघरी हेच चित्र दिसतयं की, नवरा-बायको दोघांच्याही काबाडकष्टानं मराठी संसाराचा गाडा जेमतेम रूळावर येतो न् येतो तोच, घरातील कुणीतरी वयोवृध्द व्यक्ति हृदयरोग, ब्रेन्स्ट्रोक (बर्याच वेळा याला अनियंत्रित ’मधुमेह-रक्तदाब‘ हे एक प्रमुख कारण असतं), कॅन्सर अशा अतिखर्चिक उपचारपध्दती असलेल्या रोगांना बळी पडते आणि लोकलज्जेस्तव ऐपत नसतानाही कर्ज काढून कराव्या लागणार्या खाजगी इस्पितळांमधील उपचारांमुळे, उभं राहू पाहणारं मराठी घरकुल, पुन्हा कधि वर ’न‘ उठण्यासाठी खाली बसतं! अशा तर्हेचं आक्रंदन घराघरांतून मौजूद असतानाही, आमचं ’मराठी मन‘ सदैव ’रोगमुक्त’ ठेऊ शकणार्या ’योग-प्राणयामा‘कडे पाहिजे त्याप्रमाणात वळू इच्छित नाही, हा दैवदुर्विलास आहे!
थोडं विद्यार्थीवर्गाकडे व तरूणपिढीकडे वळून पाहिलं की जाणवतं हे की, ’लैगिक-शिक्षणा‘पेक्षाही अधिक गरज या विद्यार्थीवर्गाला वा युवापिढीला कशाची असेल, तर ती सातत्यपूर्ण ’योग-विद्येची‘! ”मनः प्रशमनोपायः योग इत्यभिधीयते ।“ (मनाला शांत करण्याचं तंत्र किंवा उपचार म्हणजे योग!) या सूत्रानुसार योगाभ्यासाव्दारे ’श्वास-प्रश्वासाच्या‘ गती-प्रक्रियेवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवून, अति-चंचल मन शांत झाल्यामुळे (चले वाते, चले चित्तम्….) चंगळवाद व व्यसनाधिनतेकडे वळून ‘आत्मघात‘ करू पाहणारी तरूणपिढी निश्चित वाचवता येईल व पर्यायानं समाजजीवन व राष्ट्रकारण, सुखद व आमूलाग्र बदल अनुभवेलं!
विद्यार्थी व युवापिढी योगसाधनेकडे ’न‘ वळण्यामागे प्रमुख कारण म्हणजे, त्यात मनोरंजनात्मक मूल्यांचा व स्पर्धात्मकतेचा असलेला पूर्ण अभाव, तसेच त्याच त्या काहीशा कंटाळवाण्या तांत्रिक प्रक्रियांच्या वारंवारितेसोबत घ्यावे लागणारे कष्ट! यातून मार्ग काढण्यासाठी या युवापिढीला सुगम व कमी कष्टसाध्य असलेल्या, तरीही विलक्षण परिणामकारक असलेल्या, प. पू. रामदेवस्वामींकृत प्राणायाम-प्रक्रियेची व सुलभ योगासनांची तोंडओळख करून देण्यात आपण यशस्वी ठरलो व काही काळाच्या अभ्यासापश्चात शरीर-मनाला होणार्या लाभांची व वाढत्या मनोकायिक क्षमतांची प्रचिती, या युवापिढीला आली की, आपल्या पिढीपेक्षा अधिक ज्ञानग्रहणी व बहुश्रुत असलेली ही पिढी, योगमार्गावर आपसूक पदक्रमणा करेल, यात मुळीच शंका नको! ज्या युवापिढीचे केस ऐन विशीच्या आत पांढरे व्हायला लागलेत, तिशीच्या आत ’हृदयरोग-रक्तदाबा‘ सारखे विकार ज्यांच्याभोवती पिंगा घालू लागलेत, त्या पिढीला हे समजावणं आपलं धर्मकर्तव्य आहे की, ”समज आल्यापासून जेवढया लवकरात लवकर नियमित दिनचर्येत पाऊण-एक तासाच्या योगाभ्यासाची आपण पेरणी करू, त्यातूनच उद्याच्या शतपटीनं वर्धिष्णु ’निरोगी-निरामय’, आयुर्मयादेचं ’उदंड पीक‘ आपल्याच हाती येणार आहे!“
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १४ नोव्हेंबर, १९५४ साली हैद्राबादयेथील ’मराठवाडा साहित्यपरिषदेत‘ भाषण करताना म्हणाले होते की, ”भारतातील सर्वभाषिक प्रांतात अत्यंत दुर्दैवी प्रांत कुठला असेल, तर तो ’महाराष्ट्र‘ होय! इतर परप्रंातीयांकडून संपूर्णपणे नागवला गेलेला, हा भोळाभाबडया माणसांचा प्रदेश आहे. भारतीय नागरिक सर्व एक, हे जरी खरे असले, तरी व्यवहारात ही भावना निरर्थक आहे. राजकारणात हे औदार्य अंगलट येते व भोळयाभाबडयांचा घात होतो!“ आधुनिककाळाच्या रेटयात या ’नागवल्या गेलेल्या व म्हणूनच मागे पडलेल्या‘ भोळयाभाबडया मराठीजनांना, पुन्हा एकवार ’अटकेपार झेंडा‘ लावण्यासाठी व शिवछत्रपतींप्रमाणेच जाज्वल्य राष्ट्रधर्म निर्मिण्यासाठी गरज आहे, ती एका तेजस्वी व निरोगी-निर्व्यसनी तरूणपिढीची… आणि ही अशी ’पिढी‘, फक्त अविरत योगाभ्यासाच्या मजबूत ’शिडी‘वरच चढून गगनाला गवसणी घालू शकेल!!!“
”योग-प्राणायाम, आत्म्याशी संवाद!चंगळवाद, आरोग्यहानी निर्विवाद!!“
– राजन राजे ९८२१०६४८९८
— राजन राजे
Leave a Reply