मराठी राजभाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा!
मराठी माय माझी…
मराठी माय माझी…
ममतेचा करते वर्षाव मजवरी…
मराठी माय माझी…
ममतेने करते संस्कार मजवरी…
मराठी माय माझी…
ममतेने मला शिकवण देणारी…
मराठी माय माझी…
ममतेने मला वळण लावणारी…
मराठी माय माझी…
ममतेने माझ्या आवडी जपणारी…
मराठी माय माझी…
ममतेने माझ्या कला जोपासणारी…
मराठी माय माझी…
ममतेने मज मार्ग दाखविणारी…
मराठी माय माझी…
ममतेने मज जमिनीवर ठेवणारी…
मराठी माय माझी…
ममतेने माझे डोळे उघडणारी…
मराठी माय माझी…
ममतेने माझे जीवन घडविणारी…
कवी – निलेश बामणे ( एन.डी. )
Leave a Reply