कालचा रविवार हा सोलापूर वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक ठरला कारण होते एका जेमतेम शिकलेल्या पित्याने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णययाचे, ज्यामुळे चार व्यक्तींना जीवनदान मिळाले!
गणेश उर्फ शिवपार्थ शिवशंकर कोळी हा अवघा 14 वर्षंचा मुलगा फुटबॉल खेळत असताना उष्माघाताने कोसळला,उपचारासाठी दाखल करताच डॉक्टररांनी,मेंदुला जब्बर धक्का बसल्याने त्याचे वाचणे अशक्य आहे हे त्याच्या नातेवाईकांना सांगितले,शेवटचे प्रयत्न करण्यात आले पण शेवटी रुग्णाचा मेंदु मृत झाल्यामुळे अखेर त्याला “ब्रेनडेड” घोषित करण्यात आले.ह्यानंतर जेमतेम दहावी शिकलेले मुलाचे वडील शिवशंकर कोळी यांनी मला माझ्या मुलाच्या आठवणी जपायचा आहेत त्यामुळे अवयव दानाची इच्छा बोलून दाखवली.सोलापूर वैद्यकीय क्षेत्र लगेच कामाला लागले.
शिवपार्थ चे चार अवयव…..हृदय,यकृत,दोन मूत्रपिंड हे काढण्यात आले,हृदय हे हवाई मार्गाने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला पाठवण्यात आले (पुण्याच्या इतिहासातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट) व एक मूत्रपिंड अन यकृत रुग्णवाहिकेने पुण्याच्या मंगेशकर व नोबेल हॉस्पिटलला पाठवण्यात आले.एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये एका engineering शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आले जो 2 वर्षांपासून दोन्ही मूत्रपिंड निकामी असल्यामुळे डायलसीस वर होता.
आता इथे एक जीव गेल्याची खंत तर निश्चितच आहे पण त्याहून समाधान चार जीव वाचल्याचे आहे…….सलाम त्या पित्याला व मातेला ज्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला.सोलापुरातील डॉक्टरांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांना सलाम!!अवयव घेऊन जाताना ग्रीन कॉरिडॉर करण्यासाठी पोलीस अन सोलापुरातील नागरिकांनी जे सहकार्य केले त्यासाठी सर्वांना सलाम!
शेवटी एवढचं म्हणेन हि घटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपली विचारसरणी बदलण्यासाठी………..नक्की विचार करा!!!
Leave a Reply