स्व्प्नात आपले राज्य दान करणारा राजा हरीश्चंद्र
आणि रोज नवनवे भुखंड हडप करणारे सत्तेतील चंद्र
यांची तुलना केली की मला
हसावे की रडावे हेच कळत नाही ?
राज्यातील जनतेची दैन्यावस्था पाहुन
सत्तेचा त्याग करणारा सम्राट अशोक
आणि जनतेला वा-यावर सोडून
घोटाळ्यावर घोटाळे करणारा सध्याचा अशोक
यांची तुलना केली की मला
हसावे की रडावे हेच कळत नाही ?
देशाचे हजारो कोटी खावुन राजीनामा देणार नाही
असे म्हणनारा टेलीकॉमचा राजा
आणि वडीलांच्या आज्ञेखातर राज्याचा त्याग करुन
वनवासात जाणारा आयोध्येचा राजा
यांची तुलना केली की मला
हसावे की रडावे हेच कळत नाही ?
सध्याचे राज्यकर्ते आणि ईंग्रज राज्यकर्ते
यांची तुलना करताना मला बरे वाटते
कारण लोक म्हणतात
ईंग्रज जुलमी होते, भारतीयांना खुप लुबाडले
आपण पारतंत्र्यात होतो,लोकांचा आवाज त्यांनी दडपला
लोकांचे हे म्हणने मात्र मला खरे वाटते……
अमोल देशमुख,माजलगांव (बीड)
ही वात्रटीका आहे , लिहावी वाटली ,पटली म्हणुन लिहीली.
— अमोल देशमुख
Leave a Reply