नवीन लेखन...

महाकवी कालिदास रचित ” रघु वंश “

अन्तः पुरीचे जन तै नृपापरी /
कुमार जन्मास अधी निरोपिती /
श्रवोनिया अमृत तुल्य आकक्षरे /
सर्व स्वेद वर्जुनी छत्र चामरे // १६ //

निर्वातशा स्थानिय पंक जापारी /
तटस्थ नेत्रे सुत पाहिल्यावरी /
नृपास प्रेम न समाय अंतरी /
विधू पाहता बहु पूर सागरी // १७ //

तापोव्नाहूनि वशीष्ट येउनी /
करीतसे जातक कर्म ते क्षणी /
स्कार योगें बहु तेज पावला /
दिलीप सूनु मणि आकरातला // १८ //

चहूकडे मंगल वाद्य वाजती /
हर्षोछ्यवी रूप जिवाही नाचती /
दिलीप गेही नच एक वाटला /
पंथी सुरांच्या ही प्रमोद दाटला // १९ //

नसेची कारागृही कोणी बंधना /
पुत्रोत्सवी मुक्त करू जया क्षणी /
म्हणोनी फेडी पितराचीया ऋणा /
नृपाल ऐसे करि मुक्त आपणां // २० //

कुमार शास्त्री तरबेज व्हावया /
अंताप्रती शत्रुं रणात न्यावया /
अर्थज्ञ रधी-अर्थ मनांत आणुनी /
सुतास देई रघु नाम तेक्षणी // २१ //

धनीक ऐशा जन कानु शासनी /
सुरम्य अंगे शिशु शोभला जनी /
रवी करांनी जणुं बालचंद्र तो /
दिनोदिनी वाढत जात वाटतो // २२ //

कुमार जन्मे गिरीजा तिचा पती /
जयंत जन्मे शची इंद्र नंदिती /
तया परी संप्रति राज दंपती /
सुता बघोनी बहु तोष पावती // २३ //

रथांग नामा खग दंपती परी /
प्रगाड जें प्रेम परसपरा वरी /
द्विधाजरी वाटतसे सुतामुळे /
परंतु वाडोनिच होत आगळे // २४//

कुमार धात्री कर अगुली धरी/
प्रमाण राजा प्रती जाऊनी करी/
वेद तिच्या शिक्षित आद्य भाषणा/
गमे बहू तोष पित्याचिया मना // २५ //

वर्षा सुधेची जव हो तनुवरी /
मनास हो तोष जसा ज्या परी /
सुता निजां की नरराज घेउनी /
मिटोनी नेत्रां सुख पावला मनी // २६ //

स्थितीचिये पालक जें प्रजापती /
गुणाढ्या रूपे निजस्टष्टी पाहती /
स्वरूप भेदें निज थोर संतती /
ब्रम्हा तया कोसलभूप मानिनी // २७ //

अमात्य पुत्रासह जात चौल तो/
समान वर्षीय मुलात शोभतो /
शिकोनिया त्यासह मुल अक्षरे /
नदीमुखे वाग्मय सागरी शिरे // २८ //

कृपोपनीता बटूतें गुरुजनी /
शशास्र अध्यापिले मनातुनी /
प्रयन्य सारेच फलास दाविती /
क्रियाहि सप्ताचित्र स्थान पावती // २९ //

निजाश्व जें जिंकिती मारुता प्रती /
तयागुणे भानू कृमी दिशा प्रती /
विशाल प्रज्ञा रघु बुद्धिने महा /
तरे चतुः सागर शात्रहि पहा //३० //

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..