वाजत गाजत लगीन लागले झाला मोठा सोहळा
राजपुत्र समजुनी अर्पिली चम्पकबाला
आनंदली ती राजस रूप पाहूनी पतीचे
रंगवू लागली स्वप्न सुखमय संसाराचे
हाय रे दैवा!वज्राघात झाला
प्रधानपुत्र चुडामणीने गेतला वाटते बदला
मुर्खत्व पतीचे कळून आले संतापली ती बाला
प्रथम्रात्री हाकलून
दिले त्या मुर्खोत्त्माला
रानोवनी हिंडू लागला लागलीसे भुक
निवारयासाठी थांबला पाहून मंदिर एक
प्रसन्न झाली कालीमाता ठेविला वरदहस्त
आजपासुनी कालीदास तुजला
म्हणतील रे समस्त
कवित्व विद्त्व यास नसेल तुझ्या जोड
महाकवी तू एकमेव रे ठरशील अजोड
— प्रभा मुळे
Leave a Reply