कायापालट झाला जणू लोह झाले सुवर्ण
ऋतुसंहार,मेघदुत, आणि नाटक शाकुंतल
विक्रमोर्वशीय, रघुवंश हे महाकाव्य लिहिल
वानगीदाखल सांगीतली मी थोडी
शतकामागुन शतके गेली तरी
राहिली त्याची गोडी
किर्ती ऎकूनब भोजराजाने दिला त्यास सन्मान
मान मरातब अन ऎश्वर्याला आता काय वाण
कविकुलगुरू बिरूद लाभले दिगंत झाली ख्याती
राजाश्रय मिळूनी चालली सुखे साहित्य निर्मीती
सिंहलद्विपी राजा होता नाव कुमारदास महाकवीची
भेट व्हावी ईच्छा फार त्यास
आमंत्रिले कालिदासास त्याने सिंहलद्विपास
रारीपुरता घ्यावा आश्रय म्हणूनी
पहुडला एका वाड्याच्या पडवीत
वाडा होता गणिकेचा हे नव्हते त्यास माहित
रूप पाहूनी महाकवीचे स्तंभित झाली गणिका
म्हणे आत येऊनी आराम करावा एवढे माझे ऎकास
— प्रभा मुळे
Leave a Reply