कांद्याने आणले पाणी डोळ्यात साऱ्यांच्या
झोपडी पासून ते महालात राहणाऱ्यांच्या…
वाटले होते पेटतील राशी दिवाळीत फटाक्यांच्या
पण दबला आवाज फटाक्यांचाही आवाजापुढे महागाईच्या…
हॉटेलात कांद्या ऐवजी कोबी देऊ लागले
कांदा भाजीची जागा कोबी भजी घेऊ लागले….
आता तर बटाटे आणि टमाटे ही महाग झाले
त्यामुळे बटाटे – वडे आणि पाव – भाजीचे ही वांधे झाले …
पेट्रोल पाणी वीज सिलेंडर सारेच महाग झाले
सर्वसामान्य माणसासाठी आता फक्त मरण स्वस्त झाले…
मर-मर काम करणारेही महागाई पुढे हतबल झाले
गल्ली पासून दिल्ली पर्यंत साऱ्यांनीच महागाई पुढे गुडगे टेकले …
कवी – निलेश बामणे
Leave a Reply