नूरजहाँ यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. ‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव ‘अल्लाह वसई होते. नूरजहाँ यांचा जन्म पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला. संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती. नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. तेथे नूरजहाँ यांना नृत्य व गाणे शिकायला मिळाले. नूरजहाँ यांच्या गाण्यावर प्रभावित होऊन संगीतकार गुलाम हैदर यांनी पंजाबी चित्रपट ‘शीला’ उर्फ ‘पिंड दी कुड़ी’ मध्ये बाल कलाकाराची भूमिका दिली. हा चित्रपट पंजाब मध्ये गाजला. त्या काळी पंजाब म्हणजे लाहोर पण होते. १९३० च्या दशकात लाहोर मध्ये अनेक स्टूडियो स्थापन झाले. गायकाची वाढती मागणी लक्षात घेऊन नूरजहाँ यांचा परिवार १९३७ मध्ये परत लाहोरला आला. तेथे डलसुख एल पंचोली यांनी बेबी नूरजहाँ यांचे गाणे बघून ‘गुल-ए-बकवाली’ या चित्रपटात भूमिका दिली. या नंतर त्यांचा यमला जट (1940), ‘चौधरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. यातील गाणी ‘कचियां वे कलियाँ ना तोड़’ व ‘बस बस वे ढोलना की तेरे नाल बोलना’ ही खूप लोकप्रिय झाली. १९४२ मध्ये नूरजहाँ यांनी आपल्या पुढील बेबी हा शब्द काढला. त्याच वर्षी ‘खानदान’ चित्रपटातून त्यांनी लोकांचे ध्यान वेधून घेतले. याच चित्रपटाचे निर्देशक शौकत हुसैन रिजवी यांच्या बरोबर लग्न केले. १९४३ मध्ये नूरजहाँ मुंबईला आल्या. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांच्या ‘लाल हवेली’, ‘जीनत’, ‘बड़ी माँ’, गाँव की गोरी और मिर्जा साहिबाँ, अनमोल घडी या चित्रपटासाठी नूरजहाँ यांची आठवण काढतात. अनमोल घड़ी चे संगीत नौशाद यांनी दिले होते त्यातील ‘आवाज दे कहाँ है’, ‘जवाँ है मोहब्बत’ और ‘मेरे बचपन के साथी’ ही गाणी आजही लोक आवडीने एैकतात. नूरजहाँ फाळणी नंतर मुंबई लाहोरला आल्या. त्यांचे पती रिजवी यांनी शाहनूर स्टूडियो चालू केला. शाहनूर प्रोडक्शन नी ‘चन्न वे’ ची निर्मिती केली ज्याचे निर्देशन नूरजहाँ यांनी केले होते. त्यातील ‘तेरे मुखड़े पे काला तिल वे’ हे गाणे लोकप्रिय झाले. नूरजहाँ यांची शेवटचा चित्रपट ‘बाजी’ होता त्यांनी पाकिस्तातात १४ चित्रपट बनवले त्यातील १० उर्दू होते. काही कारणाने त्यांना अभिनय सोडवा लागला पण त्यांनी गाणे चालू ठेवले. पाकिस्तानात पार्श्व गायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘जान-ए-बहार’ होता. यातील ‘कैसा नसीब लाई’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या फिल्मी करियर में उर्दू, पंजाबी व सिंधी भाषात अनेक गाणी गायली. त्यांना पाकिस्तान मधील सर्वोच्च सम्मान ‘तमगा-ए-इम्तियाज’ मिळाला होता. मा.नूरजहाँ यांचे २३ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply