नवीन लेखन...

महामार्ग बनलेत मृत्यूचे सापळे

 
सध्याच्या वेगवान युगात वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन रस्ते सुधारणांवर भर दिला जात आहे. शिवाय प्रशस्त रस्त्यांची बांधणीही केली जात आहे. तरीही वाहतूक खात्याचे दुर्लक्ष आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्याची चालकांची प्रवृत्ती आदी कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांची संख्या वरचेवर वाढत आहे. परिणामी, हे रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत.

ही परिस्थिती कोण आणि कशी बदलणार हा खरा प्रश्न आहे.सध्याच्या वेगवान युगात काळ, काम आणि वेगाचे गणित जमवताना सार्‍यांचीच दमछाक हत आहे. त्यातून प्रत्येक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत सततचा प्रवास अनिवार्य होत आहे. साहजिकच वाहनांचा वापरही वाढत आहे. अर्थात ही सारी वाहने सामावून घेऊ शकतील असे प्रशस्त रस्तेही तितकेच महत्त्वाचे ठरतात. त्यादृष्टीने अलीकडे प्रयत्न होत असले तरी ते तोकडे आहेत. त्यातही ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची अवस्था वाईट आहे. काही ठिकाणी तर याला पायवाट म्हणावे का रस्ता किंवा रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी शंका येण्याइतपत परिस्थिती आहे. खरे तर सुंदर आणि प्रशस्त रस्ते हा राज्याला, किंबहुना देशाला विकासाकडे नेणारा राजमार्ग असतो. त्यामुळे अनेक विकसित देशांमध्ये रस्ते बांधणीवर विशेष लक्ष दिले जाते.या पार्श्वभूमीवर प्रशस्त रस्त्यांची उभारणी करताना ते वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित असतील याचाही विचार गरजेचा ठरतो. त्यादृष्टीने आपल्या देशातील स्थिती फारशी आशादायक नाही. कारण देशात रस्त्यांवर होणार्‍या अपघातांची संख्या वरचेवर कमी होण्याऐवजी वाढत आहे. साहजिकच या अपघातांमध्ये मृत्यमुखी पडणाऱ्या किवा गंभीर जखमी होणार्‍यांची संख्याही मोठी आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्यायचे तर येथील विविध महामार्गांवर गेल्या अकरा महिन्यात जवळप स 63
जार छोटे-मोठे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातांमध्ये अकरा हजारजणांचा बळी गेला आहे. वाढत्या अपघातांची ही संख्या कशी कमी करायची हा गंभीर प्रश्न बनला आहे. पण या बाबत पुरेशा गांभीर्याने विचार केला जात नाही हे वास्तव आहे.वाहनधारकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यरत आहे. या शाखेतील कर्मचारी आणि अधिकारीवर्ग रस्ते वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवून असतो. विशेषत: वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जाते का नाही हे पाहिले जाते. नियमभंग करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. यामुळे वाहनांच्या अपघातांना आळा घालणे शक्य होते. तरिही रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी होत नाही. अर्थात या अपघातांना अनेक बाबी कारणीभूत ठरतात. त्यात वाहतूक शाखेकडून आपल्या कर्तव्यात होणारा चुकारपणा आणि वाहनचालकांची बेदरकार वृत्ती ही दोन प्रमुख कारणे म्हणावी लागतील. मुख्य म्हणजे 90 टक्के अपघात मानवी चुकांमुळे होत असल्याचे सिध्द झाले आहे. अलीकडे वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्या मानाने रस्ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे एकाच वेळी अनेक वाहने रस्त्यावर येतात. त्या सार्‍यांनाच पुढे जाण्याची कोण घाई असते. अशा गडबडीत हमखास अपघात घडतात. खराब रस्त्यांमुळे घडणार्‍या अपघातांची संख्याही मोठी आहे.परदेशात प्रशस्त रस्त्यांची संख्या मोठी आहे. पण, तिकडे वाहनांच्या वेगावर मर्यादा असतात. मुख्य म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची वाहनचालकांची मानसिकता असते. त्यामुळे तेथे तुलनेने अपघातांची सं’या बरीच कमी आहे. आपल्याकडे मात्र वेगमर्यादाही पाळली जात नाही आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबतही अनास्था दिसून येते. पण याच बाबी अपघातां ना
ारणीभूत असतात.या शिवाय सलग किती तास वाहन चालवावे याचेही काहीनियम आहेत. पण जास्तीत जास्त अंतर कापले जावे म्हणून अनेक तास सतत वाहने चालवली जातात. अशा परिस्थितीत डोळ्यावर काहीशी झापड येते आणि एखाद्या क्षणापुरता मिटलेला डोळा अपघातासाठी कारणीभूत ठरतो. मद्यप्राशन करुन वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक करणे, वाहनांची वेळेवर देखभाल न करणे यासारख्या बाबींमुळे छोटे-मोठे अपघात होतात. वास्तविक पुरेशी काळजी घेतली आणि वाहतकींच्या नियमांबाबत जागरुकता दाखवली तर यातील बरेचसे अपघात टाळता येण्यासारखे आहेत. पण, याचा विचार कोण करतो हा खरा प्रश्न आहे.गेल्या काही वर्षात शासनाने खासगीकरणातून का होईना, रस्तेबांधणीकडे लक्ष दिले आहे. त्यातून चारपदरी तसेच सहापदरी रस्त्यांची बांधणी करण्यात आली. देशातील प्रमुख महानगरे थेट रस्त्याने जडण्याचाही केंद्र शासनाचा प्रकल्प आहे. याचाच एक भाग म्हणून निर्माण करण्यात आलेल्या एक्स्प्रेस वेमुळे कमी कालावधीत अधिक अंतर पार करणे शक्य झाले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा फायदा उद्योजकांप्रमाणेच अन्य अनेकांनाही होत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास करणाऱ्यांची संख्यअही वाढत आहे. वास्तविक, इतका प्रशस्त रस्ता आणि जागोजागी लावलेले सूचनांचे फलक, अन्य सुविधा यामुळे निदान या मार्गावर तरी अपघात घडणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झालेले नाही. किबहुना, गेल्या दोन-तीन वर्षात एक्स्प्रेस वेवरील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. आता अशा अपघातांची संख्या कशी कमी करायची हा ही प्रश्न आहे. साधारणपणे एक्स्प्रेस वेवर वाहनांचा वेग अधिक असतो. अशा परिस्थितीत वेगावर नियंत्रण न राहिल्यास अपघात होतात.अलीकडे बहुतेक प्रसंगी विवाह समारंभासाठी खासगी वाहनांमधून वऱ्हाडाची ने-आण करण्यात येते. अशा वाहनात कि
ी माणसे असावीत यावरील बंधन पाळले जात नाही. त्यामुळे टेम्पो, ट्रक यासारख्या वाहनांमध्ये आवश्यकतेपेक्षा बरीच जास्त माणसे बसवली जातात. अशा वेळी अपघात झाल्यास जखमी तसेच मृतांची संख्या अधिक असते हे वेगळे सांगायला नको. महाराष्ट्रात होणार्‍या एकूण अपघातांमध्ये वर्‍हाडी वाहनांना होणार्‍या अपघातांची संख्या मोठी आहे. वास्तविक, हे अपघात सहज टाळता येण्यासारखे आहेत. वर्‍हाडाची ने-आण करण्यासाठी एसटीचा वापर अधिक सुरक्षित आणि सुलभ ठरतो. त्यामुळे या पर्यायाचा अवश्य विचार करावा. त्याचबरोबर वर्‍हाड नेण्या-आणण्यासाठी वाहन ठरवताना वाहनचालकाविषयी पूर्ण माहिती घ्यावी. त्याला कुठले व्यसन नाही, वाहन सुस्थितीत आहे की नाही

याचीही खात्री करावी. लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर चालकाला पुरेशी विश्रांती मिळेल याचीही काळजी घ्यावी. या सार्‍या बाबी लक्षात घेतल्यास वर्‍हाडी वाहनांना होणारे अपघात निश्चित टाळता येतील.वाहतूक खात्यानेही आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करायला हवे. अलीकडे वाहन चालवण्याचा परवाना देताना बर्‍याच बाबींकडे दुर्लक्ष करण्यात येत. वाहतुकीचे नियम माहित नसलेल्यांना परवाने देणे यासारख्या बाबी पुढे जाऊन वाहनांच्या अपघातांना कारणीभूत ठरतात. वाहनांच्या तपासणीबाबतही पुरेशी सतर्कता बाळगावी. या खात्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून चिरीमिरीच्या आमिषाने कर्तव्याकडे केले जाणारे दुर्लक्ष अनेकांच्या जीवावर बेतते, हे लक्षात घ्यायलाच हवे. अशा विविध बाबींचा विचार करून थोडी जागरुकता दाखवली तर रस्ते हे मृत्यूचे सापळे राहणार नाहीत.

(अद्वैत फीचर्स)

— अभय देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..