नवीन लेखन...

माझा बंगलोरू (Bangalore) प्रवास..

 

 

 

 

 

 

 

म्हणजे च माहेर घर, बरेच दिवसांपासून इच्छा होती तिथे जाण्याची, पण तसे योगच जुळत नव्हते. कारण तिथे जायचं म्हटलं तरी कुठल्या कारणाने, गेल्या नंतर रहाच कुठे, कारण तिथे कोणी ओळखीचे देखिल नाही,

 

 

आमच्या काकांच्या तोंडून फार स्तुती ऐकली होती या शहराची, इथल्या IT Envornment बद्दल Lifestyle बद्दल, म्हणून इच्छा अधिकच तीव्र होत होती. पण वेळ आणि मार्ग नव्हता. योग्य वेळेची वाट बघण्याशिवाय पर्यायही नव्हता, पण ते म्हणतात ना “सब्र का फल मीठा होता है.” आणि Office तर्फे एका Testing Project साठी म्हणून आम्हाला ला पाठवण्याची घोषणा झाली, आणि तेहि १, २ दिवसासाठी नहीं तर तब्बल ३ माहिन्यांसाठी.

 

मी खुप आनंदात होतो, कारण आता जायला कारणही मिळाल होत आणि पैसे ही खर्च होणार नव्हते (ते जास्त महत्वाच होत).

 

पुणे ते

 

सकाळी १० वाजता office मधून टिकिट collect करुन सरळ पुणे Station ला पोहचलो, लागलेलीच होती, तिथे मात्र एक घोळ झाला, आम्ही तिघे होतो पण आमचे डब्बे मात्र वेगळे आणि टिकीट एकाकडेच…

 

आमच्या सोबतच्या प्रवाश्यांनी Seat Exchange केल्यामुळे आम्ही तिघेही एका ठिकाणी येऊ शकलो, नहीं तर २२ तास एकटा बसून बोर झालो असतो, कारण आजूबाजू चे सगळे प्रवासी कन्नड़ मधे बोलत होते.

 

शेवटी रात्र संपली आणि सकाळी

८ च्या सुमारास आम्ही बन्गलोरे Stationला पोहचलो, Auto पकडून सरळ Hotel गाठले. आम्हाला Auto वाला ही भारी मिळाला होता “चंद्रू अन्ना”. मागे बघून गप्पा मारत गाड़ी चलवाणे ही त्याची खासियत… पु. लं. नि आपल्या “व्यक्ति आणि वल्ली” मधे उल्लेख करवा असा नमूना.

 

City BUS

 

Bangalore मधे पहिला दिवस, सहाजिकच इथल्या गोष्टींशी माझ मन पुण्याशी Comparision करू लागले,

 

पुण्यातील उर्फ़ PMT सगळ्याना माहिती ची असलेली, जर तुम्हाला बसमध्ये चढायच असेल तर ती नेमकी पुढे थांबणार आणि उतरायाच असेल तर कुठेतरी मागेच तुम्हाला उतरवणार, तसाच काहीतरी साम्य इथे जाणवले.

 

आपल्या इथे जश्या Private Six Seater चालतात तश्या इथे Private Buses चालतात, प्रत्येक Local bus मधे २ T.V. आश्चर्य वाटला ना मला ही ते बघून तसच काही झालेल. त्यावर कन्नड़ Movies सुरु असतात आणि प्रवासी Theatar मधे बसल्यासराखे बघतात आणि काही महानगरपालिकांच्या एक दरवाजा बसेस मधे तर फ़क्त Driver असतो, टिकिट काढ़ने आणि गाडी चलवाने ही दोन कामे तो एकटाच करतो.

 

भाषा

 

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाषा.

 

त्यात आपण पडलो मराठमोळी माणसं, मराठी बाणा आणि कणा मॉडल पण वाकणार नाही.पण इथे आल्यावर ह्याच कन्नड़ प्रेम जाणवल, लहनाताला लहान माणुस असो की कोणी मोठा, प्रत्येक जण तुमच्याशी कन्नड़मध्येच सुरुवात करणार आणि आपला चेहरा एखादा भुत बघितल्या सारखा होणार, मग काय English किंवा हिंदी शिवाय पर्याय उरत नाही. पण इंग्लिश ही सगळीकड़े चालणार असे ही नाही. Conductor, पेपर वाला, चहाच्या दुकानातला पोर्‍या ई. ठिकाणी “एका माताने राष्ट्रभाषा ठरलेल्या हिंदी” शिवाय पर्याय नव्हता. पण काही ठिकाणी याहुन वाईट म्हणजे, काहींना हिंदीचा ही परहेज मग काय “मुकी बोलीचा वापर” खानाखुणा करुन संमभाषण चालायचे.चित्रपट आणि Radioबरेचसे साधे सिनेमा गृह आणि बरेच Multiplex सुद्धा, पण इथे हिंदी चित्रपटांचे Postar राजस्थानमध्ये पाऊस पडावा तसे दुर्मिळ. मराठी सिनेमाचा तर संबंधच येत नाही, मराठीला महाराष्ट्राताच सिनेमा गृह मिळत नाही तो इथे काय मिळणार.भरीतभर म्हणजे रेडियोवरही सगळी कन्नड़ गाणी, एक रेडिओ Station सोडल्यास सगळीकड़े एकच…, त्या मुळे सिनेमाचा दीवाना असलेला मी, 3महीने गप्प फ़क्त T.V. वरील कार्यक्रमाताच आनंदी होतो.शेवटी Bangalore मधे राहून ऐवढ समाजाल की, जर तुमच्या मनातच, तुमच्या विचारताच आपल्या भाषे बद्दल आदर आसेल, तर कुठल्या ही नेत्याला ह्याचा मुद्दा करुन आपली राजकीय पोळी भाजता येणार नाही.

, पण होऊ देऊ नका इतर भारतीय भाषांवर हल्ला बोल…

— देमापुरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..