नवीन लेखन...

माझे बाळ: नियती

आम्हाला बाळाविषयी काहीतरी लिहावं असं नेहमी वाटत होतं. कधीतरी विचारशृंखलेत असलो कि काय लिहावं माझ्या बाळाविषयी ? असा प्रश्न नेहमी डोळ्यांसमोर उभा राही.अगदी काही दिवसांचे असताना त्याला आम्ही आमच्या घरी आणले होते.दुपारची वेळ होती.त्याला कपड्यात असं गुंडाळल होतं की,अगदी गाठोडं करकचून बांधावं ,तसं परंतु इतर अवयवाची हालचाल नव्हती डोळे भिरभिरत होते..मी कुठेतरी वाचले होते ‘ते फुल तृणातील इवले ‘त्याप्रमाणे वाटले मला. आज ही आठवतं की,आमचा राहुल आणायला गेला.माझ्या सौ नी बजावून सांगितलं होतं,बारा संडासा कडून आणू नको बरं का?दुसऱ्या वाटेने घेऊन ये. सांभाळून आण.कितीतरी प्रश्नांचा भडीमार ….. दुसरं कोण असतं तर म्हटले असते, तुच जात का नाही? पण राहुल ला बाळाची फार आवड..हुं हुं करीत आणावया गेला.जवळच राहत असलेल्या माझ्या मेहुणीला कन्यारत्नाचा लाभ झाला.त्यांच्या कुटुबियापेक्षा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर माझ्या सौ.ला. बाळाची आई बाबा जवळच दोन तीन चाळी सोडून असलेल्या एका छोटेखानी घरात राहत होते.सोबत काका- काकी, आजोबा, सारे एकत्रच.बाळाची आई म्हणजे सौ च्या भगिनी.बाळ जन्मल्या पासून त्याची…म्हणजे बाळाची विचारपूस घटको-घटकी सौ नी केली नसेल तर नवलचं. एकदा बाळ आल्या पासून रडत होत मला त्याच्या रडण्यामुळे माझ्या मनाची घालमेल सुरु होती काय करावे सुचेनासे झाले? भूक लागली नाही न? कि काही दुखत असावे ? आईचं दूध सुरु होतं त्यामुळे घरातल दुध नको. ज्या प्रमाणे कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन ऊन,वारा,थंडी,पाऊस यापासून संरक्षण करते त्या प्रमाणे माझ्या बाळाचं पालनपोषण मावशी (सौ) करते. हवं नको ते आमच्या हिला फार कळते. रडण्याच कारण क्षणात शोधून नाही काढेल ती मावशी कसली ?एक हलकेशी चापटी मारली अन रडणारा तो बेसुरा आवाज क्षणात बंद झाला.इवल्याश्याला मावशीची चापटी….. वर परत येथे आणणार नाही! असा दम देखील भरला.मावशीची सवय जडलेल्या बाळाला ….इतुके पुरे … जेव्हा रांगू लागलं तेव्हा मात्र त्याचं दुडु दुडु पळताना पायातील पैंजणाच्या नाद मधुर स्वरानी कानाला वेगळ्या संगीताची सवय जडू लागली होती. हो हो म्हणता बाळ एक वर्षाचे झाले. पहिला वाढदिवस स्टुलावर मांडलेल्या केककडे कुतुहलाने पाहत,हळूच डोळे मिचकावीत होते.त्यांच्या छोट्याश्या घरात सरासरी बाळाच्या वयाचीच अन्य मुलांनी गर्दी केली होती. केक कापला, ठो करून फुगा फुटला.त्या भयंकर आवाजांनी बाळ रडू लागले. मग मात्र समजावीत बाळ राहीना. आलेल्या गिफ्ट चे आमिष दाखविले गेले तरीही बाळ मावशीला घट्ट बिलगून होते.

आई मरो, मावशी उरो ! हे का म्हटले जाते.याचा उलगडा आज मला झाला.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..