नवीन लेखन...

माध्यमातील स्त्री

(एक स्त्री म्हणून या क्षेत्रात काम करताना काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात. सतत सजग असावे लागते. कारण या महिला आहेत, यांना काय कळते या पुरुषी मानसिकतेचा त्रास याही क्षेत्रात असतो. थोडक्यात ‘बायकांना काय अक्कल असते?’ या दृष्टीकोनाला या क्षेत्रातही तोंड द्यावे लागते. त्यावर मात करण्यासाठी तुमची सजगताच कामी येते. सतत सिध्द करावे लागते.)

मी स्वाती प्रशांत जोशी, सकाळ च्या मुंबई आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून काम करते. हे वाक्य ऐकताच क्षणी समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरील भाव झरझर बदलतात आणि त्यावर आदरयुक्त कौतुक झळकू लागते. हे सर्व असण्यामागचे कारण आहे, चित्रपटनाटक यातून रंगविण्यात येत असलेली पत्रकाराची व्यक्तिरेखा. त्यातही ती व्यक्ती स्त्री असेल तर मग अधिकच कौतुक डोळ्यात उमटते. गेली वीस वर्षे या क्षत्रात काम करताना मलाही हा अनुभव येत आहे.

पत्रकारिता हे क्षेत्र सर्वांनाच आकर्षित करणारे आहे. या क्षेत्राबद्दल, त्यात काम करणार्‍यांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उत्सुकता असते. खरंच काय काम करतात ही पत्रकार मंडळी असा प्रश्न असतो. रोज घडणार्‍या घटना बातमीदार वेगवेगळ्या मार्गांनी पाठवित असतो. त्याला बातमीच्या भाषेत लिहून त्याच्या महत्वानुसार ती दैनिकांच्या पानांमध्ये लावायची, हे सर्वसाधारण उपसंपादकाचे काम असते. याशिवाय पुरवणीचे काम, बातम्याचे काम असे काही विभाग पडतात ही या क्षेत्राची थोडक्यात ओळख.

मी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा यात काम करणार्‍या महिलांची संख्याही बर्‍यापैकी होती. पण आज मात्र त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आमच्या कामाच्या स्वरुपातही बदल झाले आहेत. पुर्वी महिलांना कार्यालयीन म्हणजे बातम्यांचे, लेखांचे संपादन अशी कामे प्राधान्यांने दिली जात असे. शक्यतो रात्रपाळीत काम दिले जात ने. अर्थात ही परिस्थिती सरसकट होती असे नाही. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. रात्री उशिरापर्यंत महिला कार्यालयात काम करतात, त्याचप्रमाणे त्यांना वृत्त संकलनाचीही जबाबदारी दिली जाते. पूर्वीही हे काम त्या करत असत मात्र त्यांच्याकडे सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमाच्या बातम्यांची जबाबदारी असत. आता क्राईम-राजकारण यातील बातमीदारीही महिला पत्रकारासाठी वर्ज्य राहिलेली नाही.

जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर समाजातील प्रत्येक क्षेत्रात नोकरी करणार्‍या महिलांची संख्या वाढली. त्यांचा नोकरीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. नोकरीपेक्षा करिअर म्हणून त्या या संधीकडे बघू लागल्या. आणि त्यामुळे त्यात आवश्यक त्या तडजोडी त्या करू लागल्या. या सार्‍याचा परिणाम पत्रकारिता या क्षेत्रातही दिसू लागला. या क्षेत्रातल्या कोणत्याही विभागात ती स्वत:चे कर्तृत्व दाखवू लागली. एक बाई म्हणून आपण बरोबरीने जे जितका वेळ देतात तितकाच वेळ देऊ लागली.

एक स्त्री म्हणून या क्षेत्रात काम करताना काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात. सतत सजग असावे लागते. कारण या महिला आहेत, यांना काय कळते या पुरुषी मानसिकतेचा त्रास याही क्षेत्रात असतो. थोडक्यात ‘बायकांना काय अक्कल असते?’ या दृष्टीकोनाला या क्षेत्रातही तोंड द्यावे लागते. त्यावर मात करण्यासाठी तुमची स्वाती प्रशांत जोशी, मुंबई सजगताच कामी येते. सतत सिध्द करावे लागते. उपसंपादक म्हणून कामकरावे लागते. त्याचा फायदा तुम्हाला इतरत्रही होतो.

या क्षेत्रात काम करताना तुम्हाला बाहेर आदर मिळत असतो. मात्र केवळ ग्लॅमर म्हणून अनेकजणी या क्षेत्रात येतात आणि फसतात. फसतात अशासाठी की त्यात असणारे तोटे त्यांच्या लक्षात आलेले नसतात. तुम्हाला तुमच्या घरच्यां बरोबर अगदी क्वचितच सण साजरे करायला मिळतात. लग्न, कार्यांना उपस्थित राहता येतेच असे नाही. एकही संध्याकाळ तुम्हाला तुमच्या घरच्यांबरोबर घालविता येत नाही. मुलांच्या गॅद्रिंग, पालकसभांना तुम्ही उपस्थित राहू शकत नाही. सर्वांच्या सुटीच्या वेळी तुम्ही ऑफिसमध्ये असता. हे आणि असे अनेक तोटे असले तरी तुम्ही काहीतरी सर्जनशील करत असता आणि ते नित्य नवीन असते हा सर्वांत मोठा फायदा या क्षेत्राचा असतो.

गेल्या काही वर्षांमध्ये बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले या घटना सतत घडत आहेत. त्यातही मुंबईत काम करत असताना त्याची भयानकता खूप जाणवते. आपल्या खूप जवळ काहीतरी विघातक होत असताना त्याबाबत येणार्‍या बातम्या शांतपणे हाताळणे हे अवघड काम करावे लागते. त्यातच चिंता असते, ती जवळच्या सनातेवाईकांची, मनात येत असते अरे तो तिथे राहतो, काय झाले असेल, आपले जिवलग घरी पोहचले असतील ना? आपला बातमीदा त ठीक असेल ना, त्याला घटनास्थळी काही होत तर नसेल ना याबाबत विचारपूस करत हातातले काम सुच ठेवावे लागते. काहीती अघटित होत आहे, म्हणून इतर ऑफिस लवकर सोडली जातात, पण अशाच आणीबाणीच्या वेळी आपण मात्र दटून राहत काम करायचे असते.

माझा अनुभव सांगते, मुंबईत 13 जुलै 2007 मध्ये सलग सात लोकल गाड्यात बॉम्बस्फोट झाले. वेळ ऐन गर्दीची होती, लोक घरी पतत होते. आमचे ऑफिस त्या ठिकाणाहून खुप लांब होते. पण बातम्या आमच्यापर्यंत पोहचल्या होत्या. काही काम करुन मी घरी निघाले. लोकलमध्ये बसताना सतत धाकधुक होती. माझ्या सोबतच्या महिला प्रवाशांना काही घडल्याची कल्पनाच नव्हती. फक्त गर्दी कमी का याची चर्चा सुरु होती. मला एकटीलाच माहिती होते, पण कोणाला काही सांगणे म्हणजे परत भीतीचे वातावरण पसरविण्यासारखे होते. मी गप्प होते आणि फक्त घटनेचा विचार करत होते. इतरांपेक्षा आपल्याला जास्त काहीतरी माहित आहे, या गोष्टीचा एरवी मला खूप अभिमान वाटायचा पण त्याच गोष्टी मला त्या दिवशी खूप त्रास झाला.

(त्या सर्व मुलांमध्ये सतत मला माझी मुलगी दिसत होती आणि मी अस्वस्थ होत होतो. मी इतकी वर्षं बातमीदारी करतो, अनेक अपघातांच्या बातम्या शांतपणे दिल्या. पण इतकी वाईट बातमी देण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे. आणि तो शेवटचाच ठरावा. आयुष्यात परत अशी बातमी मला कधीच द्यायला लागू नये.)

या क्षेत्रात काम करताना तुम्ही संवेदनशील असणे गरजेचे असते, मात्र भावनांवर नियंत्रण ठेवावे लागते. याचा धडा मला नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मिळाला. मी प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून सकाळच्या पुणे आवृत्तीत सप्टेंबरमध्ये रुजू झाले. जानेवारीमध्ये पुण्यातील शाळेची सहल घेऊन जाणार्‍या एका बसला अपघात झाला. त्यामध्ये पहिलीतील म्हणजे सहा-सात वर्षांची 36 मुले मृत्यूमुखी पडली. बातमी येताइंच ऑफिसमधले वातावरण सुन्न झाले. कुणालाच काही सुचत नव्हते. तरी नियमित काम सुरुच होते. अपघाताच्या ठिकाणी वरिष्ठ बातमीदार पोहचले. रुग्लयातही काहीजण गेले. पालकांची गर्दी होती. मी ऑफिसमध्येच बसून येणारे फोन घेत होते. तपशील घेत होते. सर्व बातमीदार ऑफिसमध्ये आले. त्यांनी बातम्या दिल्या. सर्व काम पूर्ण झाले. आणि त्या क्षणी सर्वात वरिष्ठ असलेले बातमीदार ढसाढसा रडायला लागले. सर्वांची थोड्याफार प्रमाणात तिच अवस्था होती. थोड्या वेळाने ते शांत झाले आणि म्हणाले, त्या सर्व मुलांमध्ये सतत मला माझी मुलगी दिसत होती आणि मी अस्वस्थ होतहोतो. मी इतकी वर्ष बातमीदारी करतो, अनेक अपघातांच्या बातम्या शांतपणे दिल्या. पण इतकी वाईट बातमी देण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे. आणि तो शेवटचाच ठरावा. आयुष्यात परत अशी बातमी मला कधीच द्यायला लागू नये. एवढेच वाटते. काम पूर्ण होईपर्यंत त्यांनी त्यांच्या मनावर ठेवलेला संयम मी पाहिला. आणि फार मोठा धडा मी शिकले. या प्रसंगानंतर माझ्यात एक वेगळी ताकद आली. कोणत्याही प्रसंगात भावनिक होऊन निर्णयक्षमता न गमवता तत्परतेने निर्णय घेण्याची ती ताकद होती. त्याचा माझ्या वैयक्तिक आयुष्यातही खूप उपयोग होत आहे.

तसे पाहिले तर हे क्षेत्र पुरुषांच्या मक्तेदारीचे, त्यामुळे यात काम करताना तुम्हाला सतत सिध्द करावे लागते. सर्वांत महत्वाचे तुमची स्पर्धा असते ती सहकार्‍यांशी आणि त्यांच्यातल्या पुरुषी मानसिकतेची. तुमच्या क्षमता दाखवून देण्यासाठी पुरुष सहकार्‍यांपेक्षा दुप्पटीने काम करावे लागते, कारण तुम्ही फक्त स्त्री असता म्हणून …..

स्वाती प्रशांत जोशी,
मुंबई.

(सौजन्य – “पंढरी प्रहार”)

— स्वाती प्रशांत जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..