पांडुरंगशास्त्री आठवलेंनी अवघ्या समाजाला माणुसकीचा आणि मानवतेचा धर्म नव्याने दाखवून दिला. त्यांचे सहजसुंदर तत्त्वज्ञान अवघ्या जगात प्रसिद्धी पावले. रॅमन मॅगसेसे, टेम्पल्टन पुरस्कार, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. आज समाजातील सौहार्द संपत असताना आणि जातकारण वाढत असताना पांडुरंगशास्त्रींच्या तत्त्वज्ञानाचा नव्याने जागर होण्याची गरज आहे. 25 ऑक्टोबर रोजी येणार्या
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जागवलेली आठवण.भारताने अध्यात्मिक शिकवणीतून जगाला बर्याच गोष्टी दिल्या आहेत. विशेषत: मानसिक शांतीसाठी अध्यात्माला पर्याय नसल्याचे अनेक ज्ञानी मंडळींनी दाखवून दिले आहे. अध्यात्म्य केवळ एका पुस्तकाचा विषय नसून ते अगाध आहे. प्रत्येकजण त्यातून आपल्याला रुचेल आणि समजेल तेवढे घेऊन जीवनात मार्गक्रमण करत असतो. अध्यात्मातून अनेक कठीण प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. भारतीय संस्कृतीच्या या अमूल्य ठेव्याच्या प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला. अशीच एक महनीय व्यक्ती महाराष्ट्रात होऊन गेली. या व्यक्तीचे नाव पांडुरंगशास्त्री आठवले. पांडुरंगशास्त्रींनी स्वाध्याय परिवार निर्माण करून जगाला विवेक आणि कर्तव्य शिकवले. आपल्यातील ‘मी’चा त्याग करून इतरांबद्दल प्रेम आणि आदर बाळगणे ही स्वाध्यायाची शिकवण. स्वाध्यायींमध्ये जात, धर्म, पंथाला स्थान नाही. पांडुरंगशास्त्रींनी साध्या शिकवणुकीतून जगभर अनुयायी मिळवले. स्वाध्यायी हा पंथ नसून तो एक विस्तृत आणि विशाल परिवार बनला. ‘जय योगेश्वर’ म्हणून एकमेकांना अभिवादन करण्याची पद्धत या परिवाराची विशेष ओळख बनली. एवढे अनुयायी मिळाल्यानंतर कोणत्याही नेत्याला स्वत:चा मोठेपणा मिरवण्याचा मोह झाला असता. असे अनेक तथाकथित साधूसंत समाजात वावरताना दिसतात. द
ी वाढवून साधू झाल्यावर इतरांना मोहमायेचा त्याग करण्याचा उद्देश करायचा आणि स्वत: मात्र या सगळ्यांची हाव ठेवायची असे त्यांचे दुहेरी धोरण असते. परंतु, पांडुरंगशास्त्री आठवलेंनी स्वत:तील साधेपणा शेवटपर्यंत ठेवला. मोठेपणा मिरवणे त्यांना कधीच अशक्य नव्हते. परंतु, ते स्वाध्यायाची शिकवण इतरांना देतानाच स्वत:ही जगले.अशा पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्वाध्याय परिवार
माहित नाही असा भारतीय शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाला कधी तरी जय योगेश्वर म्हणणारा स्वाध्यायी परिवारातील व्यक्ती भेटतेच. पांडुरंगशास्त्री आठवलेंसारखी माणसे समाजाचे केवळ भूषणच नाहीत तर त्यांच्या सारख्यांच्या कार्यामुळे समाजाला आगळा अर्थ प्राप्त होतो, समाज आचार-विचारांनी समृद्ध आणि संपन्न होत असतो. अशा थोर व्यक्तींमुळेच समाजाला आशेची पहाट दिसते. म्हणूनच स्वाध्यायाची ध्वजपताका जगभरात कोट्यावधी स्वाध्यायी अभिमानाने मिरवताना दिसतात. पांडुरंगशास्त्री यांचा जन्म कोकणातील रोहे या गावी झाला. पारंपरिक शिक्षणासोबतच त्यांनी सरस्वती संस्कृत पाठशाळेत संस्कृत व्याकरणासमवेत न्याय, वेदांत, विविध भाषांतील साहित्याचा अभ्यास केला. त्यांना मुंबईच्या ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ ने सन्माननीय सभासदपद देऊन सन्मानित केले होते. या संस्थेच्या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग वगळता सर्व मानव्य शाखेतील प्रमुख लेखकांच्या साहित्याचा अभ्यास केला. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणांचे अध्ययन आणि चिंतन केले. मुंबईच्या माधवबागेतील श्रीमद्भगवतगीता पाठशाळेत पांडुरंगशास्त्री यांनी पवित्र व्यासपीठावरून अखंडपणे वैदिकांचा तेजस्वी जीवनवादाचा (वे ऑफ लाईफ, वे ऑफ वर्शिप, वे ऑफ थिंकिंग) विचार सातत्याने मांडला. त्यांचे तेजस्वी विचार ऐकण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिक गर्दी करत असत. सार
च एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसत.स्वाध्याय हा पंथ नाही, पक्ष नाही, गट, संप्रदाय किंवा कुठला धर्मही नाही. स्वाध्याय ही एखादी संस्थाही नाही. स्वाध्याय नेमके आहे काय ? स्वाध्याय ही एक प्रवृत्ती आहे; चळवळ किवा आंदोलन नाही. वृत्तीला श्रेष्ठ बनवते आणि मनुष्याला श्रेष्ठाचा परमेश्वर करते ती प्रवृत्ती ! स्वाध्याय म्हणजे इश्वराचे काम करण्याची प्रवृत्ती. स्वाध्याय म्हणजे धर्म आणि संस्कृती समजावणारा खरा दृष्टीकोन. स्वाध्याय म्हणजे समजूतदारपणा. स्वाध्याय म्हणजे निष्ठा. स्वाध्याय म्हणजे विवेक आणि ध्येय-आदरनिष्ठा. स्वाध्याय म्हणजे जीवननिष्ठा. स्वाध्याय म्हणजे कर्तव्यपरायणता. स्वाध्याय म्हणजे प्रभुप्रेम. स्वाध्याय म्हणजे ‘स्व’ चा अभ्यास. स्व म्हणजे शरीरात असलेले चैतन्यतत्व. या चैतन्यतत्वाला चिकटलेला अहम आणि इच्छा. स्वत:चा स्व ओळखणे, दुसर्याच्या ‘स्व’ बद्दल आदर बाळगणे आणि त्याचा अभ्यास करणे म्हणजे स्वाध्याय. कोणत्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता स्वाध्यायाचे कार्य चालते. स्वाध्यायींच्या कार्यासाठी पांडुरंगशास्त्री यांनी ऐकणे, भेटणे, विचार करणे आणि सोडणे या चतु:सूत्रीची वैचारिक बैठक निर्मिली होती. यच्चयावत मानवांचा आत्मविकास साधण्याच्या ध्येयातून स्वाध्यायाची निर्मिती झाली. जीवनातील श्रेष्ठतम संबंध, प्रभुप्रेम प्राप्त करण्याचे ध्येय ठेवून त्याची उभारणी झाली. आपल्या प्रवचनांद्वारे पांडुरंगशास्त्री यांनी एका विचारसरणीचा श्रोतृवर्ग निर्माण केला. साधुत्वाची निर्मिती झाल्याशिवाय आत्मविकास साधणार नाही, हे हा श्रोतृवर्ग जाणतो. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार स्वाध्यायातून मांडला जातो. कोणत्याही लाभाचा विचार न करता आठवड्यातून एकदा भेटणे, विकासाच्या बाबतीत काही ऐकायचे असेल तर त्यावर विचार करणे. स्वाध्यायात बसल्यावर
्यवहारी वृत्ती, स्थिती, अधिकार, स्थान विसरून जायचे. त्यामुळे आपण एकाच पित्याची लेकरे आहोत ही भावना वाढीस लागते. स्वाध्याय करून फायदा काय, असा प्रश्न कुणी अज्ञानापोटी विचारणे अशक्य नाही. स्वाध्यायाच्या दृष्टीकोनातून क्षणभंगूर अथवा नश्वर असा कोणताही फायदा स्वाध्यायीला नको असतो. स्वाध्यायाने सर्वांना आशा, स्फुर्ती आणि धैर्य मिळते. स्वत:चा जीवनविकास होईलच अशा आशावाद दृढ होतो. सुखदु:खे समे कृत्वा… या मंत्राद्वारे स्वाध्यायींना स्फुर्ती मिळते. केलेले फुकट जात नाही, हा विश्वास दृढ असल्याने त्यांचे धैर्य आणखीनच अखंडित होते.स्वाध्याय प्रत्येक व्यक्तीत आत्मगौरव निर्माण करतो. प्रत्येक व्यक्तीला कृतीशील बनवतो. मानवामानवातील भेदभाव दूर करतो. जात, वर्ण, पंथ यांना महत्त्व न देता आपण एकाच पित्याची लेकर आहोत, रक्ताच्या संबंधांपेक्षा उच्च अशी अनुभूती स्वाध्याय देतो. स्वाध्याय माणसात कार्योत्सव वाढवतो. स्वाध्यायी एकांतात चित्त एकाग्र करून आंतरिक विकास साधतो आणि समूहात फिरून कर्मयोग आणि बहिर्भक्तीद्वारे स्वत:चा जीवनविकास साधतो. स्वाध्याय भक्तीचे खरे ज्ञान देतो. भक्ती ही केवळ कृती नाही तर वृत्ती
आहे, ही जाणीव स्वाध्यायाद्वारे येते. स्वाध्याय ऐक्यभावना वाढीस लावतो. स्वाध्यायींनी
स्वकष्टाने कुठलीही अपेक्षा न ठेवता श्रमदानाने केलेली कामे पांडुरंगशास्त्री यांच्या कार्याचे खरे मोल विषद करणारी आहेत. 1992 मध्ये पांडुरंगशास्त्री यांना टिळक पुरस्कार जाहीर झाला. तो प्रदान करताना तत्कालीन राज्यपाल चिदम्बरम सुब्रह्यण्यम म्हणाले होते की, विद्वान आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षित राहाते. पांडुरंगशास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरणात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील आशेचा देदीप्यम
ान किरण आहेत. पांडुरंगशास्त्री यांना कृतज्ञ दंडवत.(अद्वैत फीचर्स)
— सुमित गाडे
Leave a Reply