मानवाचा जन्म प्राण्यापेक्षा वेगळ जीवन जगण्यासाठीच ईश्वरान मला मानवाचा जन्म दिला …पण मी आज प्रण्याचाच जीवन जगण्यात धन्यता मानतोय स्वच्छेने !कधी प्रेमाच्या नावाखाली कुत्रांसारखा वास काढत फिरतोय… कधी प्रेम मिळविण्यासाठी नात्याचं ओझ वाहतोय गाढवासारखं स्वच्छेने !कधी कधी बैलासारखा राब राब राबतो पैसा कमावण्यासाठी …कधी कधी त्याच पैश्याच्या अहंकारात उधळतो घोड्यासारखा स्वच्छेने !कधी कधी छोट्या प्राण्याची शिखर करतो वाघ सिहा सारखी …मुबलक शाकहारी जेवण असताना मांसाहार करतो स्वच्छेने !माकडासारख्या आयुष्यभर उड्या मारतो स्वच्छेने ….मरतो मात्र अपघाताने मुंगीसारखा ते मात्र त्याच्या इच्छेने !
— निलेश बामणे
Leave a Reply