नवीन लेखन...

मानसिक तणाव (क्रमशः पुढे ४ वर चालू )

मी एका बँकेमध्ये गेलो होतो. पैसे काढायचे होते. इतर बरेच जण रांगेत होते. मी कॅशरकडे बघत होतो. पैसे घेणे, पैसे देणे, नोटा भराभर मोजणे, त्या एकत्र बांधणे, बांधलेल्या गड्यामधून नोटा घेणे, मोजता मोजता गिऱ्हाईकांशी मध्येच बोलणे, फोन मोबाईल घेणे, बोलणे, कुणीतरी कर्मचारी मागून आला तर त्याच्याशी बोलणे. अशी अनेक छोटी छोटी व त्याच्या प्रमुख कामाना व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी तो सहज करीत होता. हजारो नव्हे लाखोच्या नोटा तो हाताळत होता. कल्पना येते की थोडीशी चुक त्याच्या हिशोबांत प्रचंड तफावत निर्माण करु शकते. पण ते तो सार सहजतेने करीत होता.

डॉक्टर सुध्दा मोठे मोठे ऑपरेशन करताना देहामधल्या अवयवांची काटछाट, रक्तस्त्राव, तो टिपणे, रक्त नलीका बांधने, रक्तस्त्राव थांबवणे, अवयवांची जुळवा-जुळव असे एक नव्हे अनेक थरारक गोष्टी सहजतेने करताना दिसतात. गंमत म्हणजे हे सारे ते करीत असताना, इतर सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारीत असतात. चालू खेळ, चालू राजकारण वा सिनेमे इत्यादी अनेक विषयांवर ती बोलतात. मात्र ऑपरेशनमध्ये बाधा न येता, सारे कसे सहज केल्या प्रमाणे वाटते.

अशाच प्रकारे अनेक व्यवसाय असतात, ज्यांच्या कामामध्ये जेवढे लक्ष केंद्रीत करण्याची गरज असते, त्याचवेळी धोका होण्याचा, नुकसान होण्याची खूपच शक्यता वाटते. अशी माणसे मानसिक तणावामध्ये सतत असतील असा ग्रह इतरांचा असतो. परंतु असे मुळीच नसते. व्यवसाय आणि मानसिक तणाव ह्या भिन्न गोष्टी आहेत.

एक तत्व असे आहे. प्रत्येक व्यक्ती त्याची जेवढी बुध्दी असेल, त्याच्या फक्त १५ ते २० टक्केच तो ती वापरत असतो. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो. ह्याचाच दुसरा अर्थ प्रत्येक व्यक्ती कार्य कुशल झाल्यानंतर जी बुध्दीची क्षमता वापरतो ती एखाद्या यंत्राप्रमाणे होवून जाते. वैचारिक बुध्दीचा,भावनेचा तेथे सहभाग नसतो. ते त्याचे काम मेकॅनीकल होवून जाते.

थोडेसे सतर्क राहून तो ज्या ज्या गोष्टी करतो त्या केवळ रोबोट अर्थात मानव यंत्राप्रमाणेच असतात. आधी फिड केलेलेच नंतर आपोआप बाहेर येवू लागते. जर नवीन क्रियेशन वा नुतन निर्मीती असेल, तरच जादा बुध्दीची अवशक्ता असते. दैनंदीन कार्याला अत्यल्प बुध्दीचा वापर होतो हे जर लक्षात आले, तर “तुमचे कार्य तणाव निर्माण करणारे आहे ” हा विचार शिथील होईल. कोणत्याही क्षेत्रात जा डॉक्टर, इंजिनीयर, वकील, सी.ए वा कलाकार, नट त्यांचे कार्य फक्त चाकेरी बध्द असते.इतरांना कदाचित्, महान अप्रतीम असे वाटेल, परंतु ते त्या व्यक्तीच्या अंगवळणी पडते व त्यात सहजता येते. दैनंदीन कार्यात मेंदूचा वापर कमी असल्यामुळे तणाव नसतो.अभ्यासानंतर कोणत्याही दैनंदीन कार्यात बुध्दी क्षमतेचा सहभाग फारच अल्प असतो.येथे ती व्यक्ती तणावमुक्त असते.मानसिक तणाव अशा वेळी कल्पनेने निर्माण केले जातात.चाकोरीबध्द कामे करताना बुध्दीवर ताण पडत नसतो.परंतु विचारांचा मार्ग थोडासा वेगळा झाला की तो तणाव निर्माण करु शकतो.

क्रमशः पुढे ५ वर चालू-

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

e-mail bknagapurkar@gmail.com

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..