नवीन लेखन...

मानसिक तणाव -२

प्रिय वाचक – – -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद.

मानसिक तणाव

(हा लेख क्रमशः आहे )

 

माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.

अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.

शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे  ही संकल्पना. अदृष्य परंतु प्रचंड कार्य क्षमताप्राप्त असे असते.

दोन गोष्टींचा शोध आजतागायत २खील लागलेला नाही. त्यांच्या बद्दल खूप माहीती, ज्ञान प्राप्त आहे. परंतु त्यांना कुणीही  बघीतल नाही. ते म्हणजे एक परमेश्वर आणि दुसरे माणसाचे मन.

मनाचे Physicial Existance  अर्थांत शारीरिक अस्तित्व दिसत नसले, तरी त्याचा क्रियात्मक सहभाग Activity in form of Energy दिसून येतो.

मानवाने प्रकाश शक्तीला, उष्णता शक्तीला, विजेच्या शक्तीला, वादळ-वाऱ्याच्या शक्तीला, जवळ जवळ सर्व प्रकारच्या शक्तीना अंकित करण्याची कला बऱ्याच अंशी साध्य केली. मनाच्या शक्तीची कल्पना ही मानवाला युगानुयुगे आलेली आहे, परंतु आजतागायत त्या मनःशक्तीला कुणीही अंकीत करु शकले नाही. अनेक ऋषी, संत महात्मे, विद्वान मंडळी, मोठ मोठे धर्मग्रंथ यांनी मनास शांत करण्याबद्दल अनेक मार्ग सुचविले आहेत. तरी देखील त्या मनावर कुणालाही ताबा मिळवता आलेला नाही. त्या आणि कोणत्याही सामान्य व्यक्तीला. विचारांनी प्रचंड बुद्धीमान, जागतीक मान्यतेची असलेले अनेक  थोर महात्मे आपल्या चंचल मनासमोर हत्-बल झालेले आम्हाला माहीत आहेत. अध्यात्म शास्त्र, विज्ञान शास्त्र यांनी देखील मनासमोर हात टेकलेले आजतरी दिसते.

चंचलता हा मनाचा गुणधर्म. मन केव्हांच शांत, स्थीर

असणार नाही. ह्या चंचल मनाच्या हालचालीमुळे जेव्हां शरिरावर शरिरामधल्या अवयवावर  परिणाम होतो, त्यालाच मानसिक तणाव असे सर्वसाधारण म्हणतात. शरिरामध्ये होणऱ्या व्याधीला जेव्हां मन ही संकल्पना जबाबदार असते वा ठरते, तेव्हां आपण हे सारे मानसिक तणावामुळे झाले असे संबोधतो. जर सुक्ष्म पद्धतीने विचार केला तर आजचे शरिर विज्ञान सांगते की जवळ जवळ सर्वच रोगांचे कारण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मनाच्या हलचालीमुळे मानसिक तणावामुळे निर्माण झालेले असते.

याचा अर्थ सुदृढ शरिर केवळ सुदृढ मनामुळेच असू शकते. Healthy Mind in Healthy body म्हणतात. ते ह्यालाच.

शरिरावर राज्य करते ते तुमचे मन. तुम्हाला सम्राट बनवते ते मन आणि भिकारी करुन टाकते तेही तुमचे मन. जगाच्या इतिहासांत आजपर्यंत अनेकजणानी जसे ऋषीमुनी, संत महात्मे, विचारवंत, विद्वान, निरनिराळे धर्म व त्यांचे गुरुजन यांनी मनावर ताबा मिळवण्याचे अनेक मार्ग सुचविले.

पण खऱ्या अर्थाने कुणासही त्यात आजपर्यंत यश आलेले नाही. मनाच्या चंचल गुणधर्माचे आणि त्याच मनामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचे महत्व येथेच दिसून येते.

ज्या घटना जीवनामध्ये घडत असतात, त्याना तीन कारणे प्रामुख्याने असतात.

१) वातावरण, जे निसर्ग निर्मीत असते.

२) परिस्थिती, जी मानव निर्मीत असते, आणि

३) वैयक्तीक स्वभाव विशेष.

ह्या जणू घटनेच्या त्रिकोणाच्या तिन बाजू ठरून घटना होत जाते. जीवनचक्रामध्ये घडणाऱ्या घटना ह्या निसर्ग निर्मीत वा ईश्वर निर्मीत केव्हांच नसतात. मात्र आपण त्या घटना निर्माण करण्यास कारणीभूत असतो. व्यक्ती तितके स्वभाव. स्वभाव तितक्या घटना. प्रत्येक घटना अनेक अनुभवाना जन्म देत असते. हेच भिन्न भिन्न स्वभाव पुन्हा विविध घटना घडण्यास कारणीभूत होत असतात. असेच जीवनाचे चक्र चालू राहते. घटनांच्या क्रियांचा आपल्या मनावरचा परिणाम म्हणजे सुखदुःखाच्या लाटांची निर्मीती.

घटना व प्रसंग कसे घडतात हे प्रथम जाणले पाहीजे. त्या ईश्वराची वा निसर्गाची एक महान कलाकृती व योजना ही घटनांच्या माध्यमामधून दिसून येत असते. निसर्गाने त्याचे नियम केलेले आसतात.ते सतत, सारखे आणि निश्चीत पद्धतीने चालत असतात. ह्या मध्ये क्रिया वा प्रतिक्रीया घडत असतात. घटना ज्या घडत असतात, त्या फक्त निसर्गाच्या चाकोरीमधूनच. प्रत्येकजण हाच घटनांचा निर्माता असतो. ह्यामध्ये ईश्वराची भूमिका वा प्रत्यक्ष सहभाग केव्हांच नसतो. घटना धडण्याचे स्वातंत्र आणि परिणाम ह्याचा प्रत्यक्ष आपल्याशीच असतो.

घटना ह्या आवडणाऱ्या, भावणाऱ्या असतात तशाच त्या न आवडणाऱ्या  देखील असतात. घटना ह्या सुख दुःखाच्या लाटा निर्माण करीत असतात. त्या नेहमी प्रासंगीक असतात. परंतु कोणतीही सुख दुःखाची लाट ही “मानसिक तणाव  निर्माण करते” ह्या सदरांत मोडत नसते.  निसर्ग वा काळ अशा घटनाना शारिरीक हानी न पोहंचू देता, सर्व सुसाह्य करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ह्याच घटनामधून जन्म होतो, निर्मीती होते ती तुमच्या स्वभाव रचनेची. हाच अत्यंत महत्वाचा धागा आहे, पायरी आहे, मानसिक तणावाची. तुमचा निर्माण झालेला स्वभाव, तुमच वागण, हे जेव्हां सभोवतालच्या परिस्थितीवर आघात करतो, त्याचवेळी जन्म होतो मानसिक तणावाचा.

म्हणून अत्यंत महत्वाचे –   अत्यंत महत्वाचे –  म्हणजे प्रत्येकांचे स्वभाव हेच मानसिक तणाव याची चौकट निर्माण करीत असतात. कोणतीही आवती भोवतीची परिस्थिती नव्हे. हे निसर्गाचे वरदान समजा.

 

क्रमशः पुढे २ वर चालू –

 

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..