नवीन लेखन...

मित्र पालक

रात्री आईजवळ झोपण्यावरुन लहान मुलांमधे होणारी भांडणं ही तर प्रत्येक घराची खासियतच आहे. प्रत्येक घरातील मुलांचा आणि आयांचा प्रकार वेगवेगळा असला तरी भांडणं मात्र तीच.
प्रत्येक मुलाला वाटत असतं आईने आपल्याच जवळ झोपावं आणि झोपताना फक्त आपल्याशीच बोलावं.
समजा, घरात दोन मुलं असली आणि आई जर दोन मुलांच्या मधे झोपली, तरी प्रत्येक मुलाला वाटतं आईने माझ्याचकडे पाहून बोललं पाहिजे.
अशावेळी आईची चिडचिड होते.
काहीवेळा आई थकलेली असते,कंटाळलेली असते पण ह्याची जाणीव मुलांना नसते.
आणि मग,मुलांना न आवडणारं एखादं वाक्यं ती नकळत बोलून जाते. ज्यामुळे मुले खोलवर दुखावली जातात.
आणि विशेष म्हणजे,ही आपली नाराजी मुले स्पष्टपणे कुणालाच सांगत नाहीत.
ह्या प्रकारामुळे मुले शांतपणे,प्रसन्नपणे झोपी न जाता वैतागून,त्रासून किंवा चिडून झोपतात. ह्यामुळे मुलांचे आरोग्य तर बिघडतेच पण त्यांचे मानसिक आरोग्य ही बिघडते!

मुलांना हवा असतो तुमचा स्पर्श,तुमचा सहवास आणि तुमचे आश्वासक चार शब्द!
झोपायला जाण्याच्या वेळी,मुलांशी गप्पा मारा. दिवसभरात त्यांनी काय काय केलं? त्यात त्यांना काय आवडलं? काय आवडलं नाही? ह्याची आस्थेने चौकशी करा.
त्यांचं बोलणं एखादवेळेस तुमच्या दृष्टीने कंटाळवाणे असेल ही पण कृपया अशावेळी तुमच्या ‘थकलेपणाची’ सबब पुढे करुन मुलाला गप्प करू नका. थोडा त्रास झाला तरी तुमच्या मुलाचं बोलणं ऐकून घ्या.

मुलांना तुमच्याशी मोकळेपणाने वागता येईल,बोलता येईल अशी तुमची वागणूक असेल तर मुले आनंदाने झोपी जातात. मुलांचे ‘मित्र पालक’ व्हा.

————————————————————————————————————-
पालकांसाठी : पण लक्षात ठेवा,मुलांच्या झोपायच्या वेळी पालकांपैकी एकाचा तरी ‘मैत्रीपूर्ण सहवास’ मुलांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
‘मित्र पालकांची मुले मस्त गुरगुरुन झोपतात’ ही चिनी म्हण जागेपणीच आठवा.
————————————————————————————————————–

— राजीव तांबे

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..