चंद्र तू पौर्णिमेचा
काळोख मी आमवस्येचा …
तुझे सौंदर्य कलेकलेने वाढत जाते
पौर्णिमेला ते पूर्ण होते…
माझ्या हृदया व्यापून टाकते
आणि पुन्हा कलेकलेने कमी होते…
आमवस्येला सौंदर्य तुझे
शेवटी कुरूप होते…
तेव्हाच खऱ्या अर्थाने
आपले मिलन होते…
©कवी – निलेश बामणे
Leave a Reply