मी – मी करुन कोणी मोठा होत नसतो म्हणून वावरतांना, मी पणा टाकायचा असतो आपल्यापुरते पाहणार्यांपासून आपलेच दूर जातात कारण काळीज असणार्यांनाच फक्त वेदना होतात. होत नसतं माझं – माझं म्हणण्यानं, काही घर माझं होत नसतंआणि दुसर्याला निंदल्यानं आपल्याला कुणी वंदत नसतं आपण घरांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचायचा नसतो. कारण
तो ऐकण्यासाठी जवळ कोणी उभा नसतो. करुन-सवरुन सर्व काही विसरायचं असतं नाहीतर जीवनाच्या बेरजेचं गणितच चुकलं असतं.
घरात दुसर्यांच्या सुखात सुख पहायचं असतं, आणि दुसर्यांच्या दु:खात, आपलं दु:ख विसरायचं असतं. सुरांमध्ये सुर मिसळून कोरसमध्ये गायचं असतं, आणि आपला तो वेगळा सुर काढून बेसुर गायचं नसतंआपल्या भावना जोपासताना दुसर्याच्या भावनेची कदर करायची असते. तेच आपलं कर्तव्य असून, जीवनाचे ध्येय तेथेच घुटमळत असते.
म्हणून माझं माझं म्हणाल्यानं काही माझं होत नसतं, तुझं-तुझं म्हणाल्यानं काही दुसर्यांचे होत नसतं.
कोणाला कधी हे समजले तर………………..
— सुषमा एडवण्णावर
Leave a Reply