एका ज्वालामुखीचे हे अंतिम स्वरुप
त्यास ही अखेर मिळाले चिता रुप
सैनिकांचे प्रेम लाभले खूप
तरीही जाताना होती काहीशी रुखरुख
का रे गड्यांनो ही दैना
आपल्या पित्याची अशी जाताना
जाणून घ्या रे त्यांची वेदना
एक झेंडा असु द्या त्यांच्या श्रद्धेचा
त्यांनी केले मोठे हे सगळे म्हणता
देव आपला सोडून इतरत्र
पणती लावता
कशी रे मिळावी त्यांना शांती आता
विचार हा येउ द्या रे क्षणभरी
मित्रांवर त्यांनी केले अपार प्रेम
राजकीय गणितांचा मानला नाही नेम
पण त्यांनी पाहिला निव्वळ आपला क्षेम
आणि म्हणे खंतच वाटते त्यांनाही
अशा वटवृक्षाचे करा हो पूजन
या अंतिम यज्ञात करा स्वार्थाचे दहन
एक होऊन महाराष्ट्राचे करा संवर्धन
हीच रे श्रद्धांजली आपल्या बापाला
डॉ. निलेश जयवंत
ठाणे
— डॉ. निलेश जयवंत
Leave a Reply