मी कसा जगू आता?, ते तुम्हीच ठरवायच?
ईश्वराने शरीर दिलय, ते मला वाढवायच
मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ? //धृ//
** शेजारचा छेड छाड करतो
पोलिस स्टेशनला तक्रार करण्यास गेली
पोलिसानेच बलात्कार केला , म्हणून रडत घरीं आली
रक्षक हाच भक्षक झाला तर संरक्षण कुणाला मानायचं //१//
मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?
** बापाने दिलेल्या फ्लॅटवर , घर बांधण्याची योजना आखली
नगरपालिकेच्या परवानग्या, ह्यातच जीवनाची कमाई संपली
माझ्या श्रमाचा पैसा, दुजा खर्चताना बघायचं //२//
मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?
** पोटाच्या विकारसाठी, हॉस्पिटलमध्ये भरती झालो,
विकार तेथेच राहिला, चांगली किडनी मात्र गमावून बसलो,
डॉक्टरांचे स्वार्थी कर्म बघीतले, तर आरोग्यासाठी कुठे जायच //३//
मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?
** कृत्रिम तेल तूप, खाण्यापीण्याचीही भेसळ
न दया माया प्रेम, आयुष्याचा करतात खेळ
निर्दयी बनलेली जीवन मुल्ये बघायचं //४//
मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?
** तुला जगायचंय ना ?
फक्त विचारावर जग
भावनेला कायमची मुठ माती दे
न सुख न दुःख, दोन्हीही सारखेच वाटतील
एखाद्या रोबाट प्रमाणे काम करीत मरुन जा
कशासाठी ?आणि कां ? असले प्रश्न करु नकोस
जग बदलतय, सवय करुन घे अशाच जगण्याची
तुला जगायचंय, तेंव्हां हे पण तुलाच ठरवायच //५//
तू कसा जगशील आता ?, ते तुलाच ठरवायच ?
(कविता)
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply