नवीन लेखन...

मी बुवा बनतो (विनोदी कथा)

 

जळलं मेलं ते

लक्षण.जेव्हा पाहावे तेव्हा यांचे तोंड कुत्रं मुतल्यासारखे.भरल्या घरात यांचे तोंड आपले वाकडेच.मी म्हणते इथे बसून कपाळाला हात लावून काही होणार आहे का.इथे नुसते बसून त्या सोफ्याचे खळेदळे करण्यापेक्षा चार ठिकाणी अर्ज केले तर निदान कोठे चार पैशाची नोकरी तरी लागेल.

काय रे असा का तोंड पाडून बसलायस.बरे बिरे वाटत नाही का काय.

अरे, काय झालेय ते तरी सांग.

काय सांगू , नोकरी गेल्यापासून कशात मनच लागत नाही बघ.

अरे मग नोकरीसाठी प्रयत्न कर. प्रयत्न करूनसुध्दा नोकरी मिळत नाहीये का.

तसे नाही, पण मी किरकोळ नोकरी करणार नाही.

मग तू करणार तरी काय

काही सुचत नाहीये

मी एक सुचवू का.

बोल

तू विविध विषयांवर बोलू शकतोस तर तेच विचार तू कागदावर का नाही मांडत.

मी समजलो नाही. मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.

अरे म्हणजे तू लेखन का नाही करत. शाळेत असतानासुध्दा तुझे निबंध किती छान असायचे.

नको रे बाबा, लेखकाची अवस्था या प्रकाशकांनी एखाद्या भिका-यासारखी करून टाकली आहे. आधी लेखकाला वणवण दारोदार भटकायला लावतात नंतर त्याच्यावर उपकार केल्यासारखे त्याचे लेखन स्विकारतात आणि दीड-दोन वर्षे तंगवतात. एवढे सगळे असल्यावर मानधनाची तर बोंबच.शेवटी एखाद्या लेखकाने फारच कटकट केली तर रस्त्यावरच्या भिका-याच्या पुढ्यात नाणे फेकावे तसा एखादा पार्ट पेमेंटचा चेक तोंडावर फेकून देतात.तेव्हा लेखन-बिखन नको रे बाबा.दुसरे काहीतरी सांग

बरं मग तू एखादा धंदा का नाही करत. हे बघ सध्या बिल्डरांचा धंदा अत्यंत तेजीत आहे.

नाही बाबा ते बिल्डर वगैरे होणे मला काही जमणार नाही.आणि तेवढे भांडवल सुद्धा माज्याकडे नाहीये. मीपटकन म्हणालो.

अरे माझे पुरते ऐकून तर घे. मी तुला बिल्डर व्हायला नाही सांगत आहे. मी तुला वाळू कंत्राटदार व्हायला सांगत आहे. याला जास्त पैसे पण लागत नाहीत. लायसन्स काढायला जो काही खर्च लागेल तोच. नंतर एखाद्या पुढा-याला हाताशी धरायचा आणि उपसायची बिनधास्तपणे वाळू नदीतून. कोणी अधिकारी मधे आलाच तर चिरीमिरी देऊन गप्प करून टाकायचा. नाहीच ऐकले तर द्यायचा पेटवून.बाकी पुढारी बघून घेईल.

नको,नको.असले गैरकानूनी काम माझ्याच्याने नाही होणार.

फारच भित्रा बाबा तू. मग असे कर ना सरळ राजकारणातच शिर. तसेही तुझे वक्तृत्व चांगले आहे. एकदा का तू निवडून आलास कि तुझे काम झाले. मग लोकांना मूर्ख बनवत भरपूर घोटाळे करायचे. ते करत असताना सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायचा मग तुझ्यावर कोणीही कारवाई करणार नाही.

असले घोटाळ्याचे काम नको. कधी सी.बी.आय.ची चौकशी मागे लागेल सांगवत नाही.ती राजकारणाची भानगडच नको.

मग सगळ्यात सेफ व्यवसाय सांगतो. तू बुवा हो.

अरे बापरे, ते अंधश्रद्धा निर्मूलनवाले हात धुऊन मागे पडतील त्याचे काय.

अरे तसला बुवा नाही बनायचे.एकदम सोफॅस्टिकेटेड बुवा बनायचे.

म्हणजे मी समजलो नाही.

तुला भगवद् गीता येते कि नाही.

अरे हे काय विचारणे झाले. अगदी लहानपणीच आजोबांनी तोंडपाठ करून घेतलीय.

रामायण, भागवत,ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा वाचलीय ना

हो तर. अगदी त्यातला कोणताही विषय मी तुला समजावून सांगू शकतो.

हो ना.मग हेच तर करायचे. फक्त चार लोकांसमोर.

अरे पण…..

आता हो नाही काही नाही. यात कोणतीही रीस्क नाही. आणि आपण लोकांना फसवत थोडीच आहोत आपण तर लोकांना ज्ञान देतो आहोत.

ठरले तर.आता बाकी सगळे मी बघतो

— राजेंद्र भालचंद्र देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..