२०१० साली प्रदर्शित झालेल्या मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते सतिश राजवाडे यांनी. रोमॅण्टिक कॉमेडी असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल. मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी या दोन तगड्या कलाकारांमुळे हा चित्रपट खुप गाजला. मुंबईहून आलेल्या मुलीची भेट पुण्यातील एका अस्सल पुणेकरी मुलाबरोबर होते आणि रंगत जाते एक विनोदी पण तरीही तितकीच प्रेमळ कथा. चित्रपट सुरु झाल्यापासूनच आपल्याला हसायला भाग पाडतो. तेव्हा हा चित्रपट पाहणं म्हणजे एक जबरदस्त सेलिब्रेशन असंच म्हणावं लागेल.
चला तर मग बघुया, २०१० साली प्रदर्शित झालेला चित्रपट, मुंबई पुणे मुंबई
—
Leave a Reply