नवीन लेखन...

मुलांवर निट लक्ष ठेवा.. वेळेपुर्वीच जागृत व्हा

पालकहो…
मुलांवर निट लक्ष ठेवा व वेळेपुर्वीच जागृत व्हा..

आजकाळची पिढी जरा लवकरच हुशार व्हायच पाहतीय… सांगण्याच्या खटाटोप अशासाठी की…

मी ज्या ज्या वेळेस कामानिमित्त घराबाहेर किंवा वेगवेगळ्या शहरात… गावात असतो.. त्या वेळी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालत नाही… म्हणजे पहा ना… प्रत्येक गोष्टींच वेळापत्रक ठरलेल असत.. भले ठिकाणे वेगवेगळी असु शकतील.. अॉफीस.. कार्यालय… नौकरी… शाळा… टुशन… अस काही…

पण यातील काही ठिकाणे वगळता… यातील शाळा व टुशन यांच्या वेळा बहुदा सर्वंच ठिकाणी एकसारख्याच असतात…

पण मंडळींनौ…, या दरम्यान शाळेतील वा टुशनमधील विद्यार्थी खरच नेमक्या ठिकाणी असतात का हो….?

कदाचित् …. या बद्दल अनेकजण वा नेहमीप्रमाणे (आंधळेप्रेम) आमचा आमच्या मुलामुलीवर भरपुर वा अतोनात विश्वास आहे… अस मनातल्या मनात म्हणाले सुध्दा असतील… छान..हरकत नाही…

पण मी अशा वेळेतही काही शाळेय मुलामुलींना अशा काही ठिकाणी पाहत असतो की… जेथे सामान्य पणे येणाऱ्या वा जाणाऱ्या जनतेची… लोकांची… नजरच जाऊ शकत नाही… कारण आपण कोणाच्याही नजरेत येऊ नये अशीच भिती या मुलामुलींच्या चेहऱ्यावर असतेच…

मग ही शाळेच्या पोशाखात, शाळेच्या वेळामध्ये… शाळेत शिकायच सोडुन बाहेर नेमकी का…? कशासाठी…? कोणासोबत…? कशाला…? बाहेर फिरत असतात हेच नेमक कळत नाही… कदाचित् लहान व अपरिपक्व वयामध्ये यांना बहुदा मजा वाटत असेलही… अशावेळी ह्यांची पालकांना व शिक्षकांना वेळप्रसंगी ठामपणे खोट बोलण्याची हिम्मतच वाढत असते.. पण या खोटेपणाचा दुरगामी परिणाम यांना माहीतच नसतो…

अशावेळी मोठमोठ्या कॉफी शॉप्स… महागड्या हॉटेलमध्ये…. साध्या टॉकीझ मध्ये… मोठ्या मॉल मध्ये… गजबजलेल्या रस्त्याच्या पासुन निर्जन ठिकाणी… मंदिराच्या कोपऱ्यात…. बागेत एकदच गर्दीपासुन लांब… बसस्टॉपवर…. अशा अनेक ठिकठिकाणी ही शाळेय मुलमुली शाळेय गणवेशात वेगळ्याच विश्वात हरवलेली असतात….

मंडळींनौ …. मी अस म्हणत नाही…की तुमचेच पाल्य असेल…? पण फक्त कळकळीची नम्र विनंती की… तुम्हीपण जागृत रहा…. कारण या लहान कोवळ्या वयामध्ये यांना आयुष्याची फारसी जाणीव नसते हो… याच वयामध्ये थोडीफार एक्साईटमेंट करायला जातात… व काही समाजकंटक अशावेळी नेमका याच अजाणतेचा जाणीवपुर्वक गैरफायदा घेतातच… मग काही विद्यार्थ्यां वाममार्गाला लागताल. (तबांकु… मावा… सिगारेट… नशा…) अशापैकी काहीही… हिरोप्रमाणे वागण हेच यांना माहीती असत… व मुली ..कोणीतरी आपल्याला गिफ्ट देतय.. महागड्या हॉटेलमध्ये जेवण वा स्नँक्स खाऊ घालतायत… आलिशान गाड्यातुन सफर करवतात… आपल्या सौंदर्यांयाची मनभरुन तारीफ करातायत… बारिक.. सारिक…. गोष्टींच .. हसण्याच… बोलण्याच… चालण्याच… लाजण्याच… बेधडक स्वभावाच…. आवाजाच… कौतुक करत असत म्हणुनही ह्या कोवळ्या वयात मुली साहजिकच हरळुनच जातात… मग नेमका हाच गैरफायदा समाजकंटकही घेतात…

पण आपला पाल्य शाळेतच गेलाय… या गोडगैरसमजुतीत असतात.. पण ही टेक्नोसेव्ही पिढी कदाचित् जरा लवकरच पुढे जायच्या घाईत आहेत… या नादात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात व्हायरस घुसु नये… याची काळजी प्रत्येक पालकांनी घ्यायलाच हवीच तेही ॲन्टीव्हायरस होऊन… हीच विनंती….

आपला हितचिंतक
–विवेक जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..