माझा गं बाळ राजा, पाळणी खेळतसे
पैंजण वाजतसे, त्याच्या पायात छमछमा ।
माझा गं बाळ राजा, घरात रांगतसे
मनगटी रूततसे, त्याच्या हाताला सांभाळा ।
माझा गं बाळ राजा, पाऊल टाकतसे
सोनसरी चमकतसे, त्याच्या गळ्यात चमचमा ।
माझा गं बाळ राजा, दुडूदुडू धावतसे
साखळी रूळतसे, त्याच्या कमरेत रुणझुणा ।
माझा गं बाळ राजा, भुकेचा हळूवार
भरवते खीर, त्याला वाटीत चांदीच्या ।
माझा गं बाळ राजा, निजेचा अल्वार
करू नका गलबला, त्याला जोजवा लवकर ।
— सौ. सुधा मोकाशी
Leave a Reply