नवीन लेखन...

मूल मित्र..

मूल मित्र..

घरातली मुलांची भांडणं हा काही नवीन प्रकार नाही.
पण त्यातला विशेष प्रकार म्हणजे पालकांची मुलांसोबत भांडणे.
या सेक्शन मधे अनेक उपप्रकार आहेत. आज त्यातलाच एक पाहू.
काहीवेळा पालकच मुलांशी भांडण उकरुन काढतात. मुलांशी मस्त भांडतात. पण नंतर त्यांना असं वाटतं की मुलेच आपल्याशी भांडत होती. अशावेळी त्या मुलांची फार पंचाईत होते. कारण आपल्या मनातील राग किंवा आपल्याला पालकांची न आवडलेली गोष्ट ही मुले आपल्या भांडोऱ्या पालकांना स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. पालकांचा अभिनिवेश पाहून ही मुले एकतर एकदम चुप्प बसतात किंवा भोकांड पसरतात. आणि मग त्या पालकांची खात्रीच पटते की,’आपलं वागणं योग्य असल्यामुळेच, मुलाची ही नाटकं सुरू आहेत.’
भांडणासाठी प्रथम कारणीभूत असते ती आपली भाषा आणि नंतर आपली कृती.
ही भाषा आणि कृती पूर्णत: अवलंबून असते ती आपल्या दृष्टीकोनावर; म्हणजे आपण त्या घटनेकडे कशाप्रकारे पाहातो त्यावर.
अगदी कालच घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. त्यावरुन तुम्हीच काय ते ठरवा.

शाळेचं स्नेहसंमेलन प्लस पालक सभा असा टू इन वन कार्या*म होता.
पालकसभेसाठी एक तज्ञ मार्गदर्शक आले होते. त्यांना इंटरेस्ट होता पालकांना ज्ञान देण्यात.
पालकांना इंटरेस्ट होता स्नेहसंमेलनात.
त्यामुळे गोंधळाचे छान वातावरण तयार झाले होते. यात भरीस भर म्हणून,पालक सभा सुरू असतानाच हॉलच्या बाहेरुन बटाटे वड्यांचा वास व कपबशांची किणकिण ऐकू येऊ लागली. साहजिकच पालकांची चुळबूळ वाढली.
मुलांना उपजतच शहाणपण असल्याने, त्यांना पालकांच्या चुळबुळीचे कारण समजले. मुलांनी पालकांना पुरक व प्रेरक ठरतील असे हट्ट सुरू केले.
थोडक्यात, तज्ञ मार्गदर्शक बोलत असतानाच अनेक पालक मार्गस्थ होऊ लागले. प्रचंड गोंधळ सुरू झाला.
याच सुमारास ती घटना घडली.
स्टेज जवळ एक मुलगा रडत आला आणि म्हणाला,’माझे बाबा मिळत नाहीत.ठ त्याचे रडणे सुरूच.
एका पालकाने त्याचे नाव विचारले व अनाउन्स केले की,’प्रदीप लेले नावाचा मुलगा हरवला आहे. त्याच्या बाबांनी कृपया स्टेज जवळ यावे.ठ
हे त्या मुलांने ऐकताच संभाव्य धोक्याची कल्पना त्याला आली. त्याने आपला रडण्याचा स्पीड व आवाज दोन्ही वाढवला.
पण त्याच क्षणी एका ‘मूल मित्र’ शिक्षकाने माइक हातात घेतला आणि ते म्हणाले,’प्रदीप लेले इथेच आहे. हरवले आहेत त्याचे बाबा!! तरी कृपया हरवलेल्या पालकांनी स्टेज जवळ यावे.ठ
आता प्रदीपच्या जीवात जीव आला.
इतक्यात तोंडात बटाटे वडा कोंबत बाबा स्टेज जवळ आले.
त्याक्षणी प्रदीप शिक्षकांच्या जवळ सरकला.
बाबा काही बोलण्याआधीच ते शिक्षक म्हणाले,’प्रदीपला अजिबात ओरडायचं नाही. कारण कार्या*म संपेपर्यंत कुणीही हॉल सोडून जायचं नाही अशी स्पष्ट सूचना सगळ्यांनाच दिलेली होती…. मला काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला कळलं असेलच?ठ
हे ऐकल्यावर प्रदीपच्या बाबांना तोंडातला वडा धड गिळता येईना आणि बाहेर ही टाकता येईना. बाबांनी मान हलवली आणि प्रदीपचा हात धरुन ते गर्दीत मिसळले.
तोंड मोकळं होताच म्हणाले, ‘कमालच आहे तुझी! रडायला काय झालं तुला? आणि एव्हढं मोठ्याने? सगळ्यांपुढे तमाशा झाला ना! पाच मिनीटं चूप्प बसला असतास तर काय बिघडलं असतं? मी काय पळून जाणार होतो? आता गप्पं बसून पुढचा कार्या*म पाहा.ठ
या प्रसंगातून अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येतील.

खरं म्हणजे बाबा हरवले म्हणून काही प्रदीप रडत नव्हता.
तर बाबा एकटेच वडा खायला गेले याचं त्याला दुख: झालं होतं.
अशा आनंदाच्या क्षणी अचानकपणे,आपण नाकारले गेलो, एकटे पडलो हे प्रदीपचं दुख: होतं.
त्याचं रडणं हे त्याचं दुख: हलकं करण्याचं एक माध्यम होतं.
मुलांच्या रडण्यामागचं कारण काहीतरी वेगळंच असतं. पण ते आपल्याला समजलंय असं समजूनच त्यांचे पालक त्यांना झापायला सुरुवात करतात.
आणि मग शब्दाने शब्द वाढत जातो. आणि नकळत मुले कायमची दुखावली जातात.

गर्दीच्या ठिकणी थोड्याफार फरकाने असा प्रसंग घडतो.
मुलगा सुरक्षित ठिकाणी असला तरी ही, हातात माइक असणारा माणूस हा मोठाच असतो. अशावेळी तो बिनदिक्कतपणे जाहीर करतो की,’मुलगा हरवला आहे!’ असं जाहीर करणं कितपत योग्य आहे?
अशा प्रसंगी आवश्यक असते योग्य भाषा आणि त्यामागचा दृष्टीकोन.
आधीच भयभीत झालेला,गोंधळलेला तो मुलगा दुखावला जाणार नाही याची काळजी आपण मोठ्या माणसांनीच घ्यायला पाहिजे ना? आणि मुलांवर अकारण रागावू नये यासाठी पालकांनाही समजावलं पाहिजे ना?
खरं म्हणजे अशा कठीण प्रसंगी मुलांना ‘मूल मित्र’ माणसांची गरज असते. रडणाऱ्या मुलावर न ओरडता, तो का रडत आहे? त्याला कशाची भीती वाटते आहे? हे तो मोकळेपणाने, निर्भयपणे सांगू शकेल अशी परिस्थिती निर्माण करणे हे आपले काम आहे.
मुलांचा विश्वास जिंकणारेच ‘मूल मित्र’ असतात.
तुम्हाला काय वाटतं?

——————————————————————————————–
पालकांसाठी गृहपाठ : आपल्या रडणाऱ्या मुलावर हात न उगारता, त्याच्या पाठीवर विश्वासाने हात ठेवा. रडणाऱ्या मुलाचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घ्या.
असाच प्रसंग समजा आपल्याबाबतीत घडला असता तर अशावेळी तुम्ही तुमच्या पालकांकडून काय अपेक्षा केली असती? हा प्रश्न मनातल्या मनात स्वत:ला विचारा.
मला खात्री आहे, त्यानंतर रडणाऱ्या मुलावर हात उगारण्याची पाळी तुमच्यावर कधीच येणार नाही कारण; घरातली रडगाणी बंदच होतील.

‘परस्परांतल्या खळाळणाऱ्या विश्वासात भांडणे विरघळून जातात’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा.
————————————————————————————————–

— राजीव तांबे

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..