लग्नानंतर बायकोच्या मूळ्नावात नवर्याने बदल करावा की करू नये ? या विषयावर जवळ – पास दहा वर्षापूर्वी ‘मूळ्नावात बदल नको !’ या शिर्षकाखाली युवासकाळ मध्ये माझे मत प्रकाशित झाले होते. मूळ्नावात बदल नको या मतावर मी तेंव्हा ही ठाम होतो आणि आजही तितकाच ठाम आहे. मला वाटत होत ज्या विषयावर मी दहा वर्षापूर्वी मत मांडल होत तो विषय आता विषयच नसेल राहिला. पण ! तो विषय आजही ताजा आहे याच मलाच आश्चर्य वाटल. मी माझ्या भारतीय संस्कृतीचा चाहता आणि समर्थक ही आहे पण याबाबतीत मात्र माझ थोड वेगळ मत आहे. ते पूर्वीपासून तसच आहे. ज्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत त्याचा मी स्विकार करूच शकत नाही. आता काही दिवसापूर्वी मी टी.व्ही वर थोडया – थोडया अंतराने दोन मालिका पाहील्या मी पुरूष असूनही हया मालिक पाह्तो हे मी अभिमानाने सांगतो कारण भविष्यात माझ्यावर एखादी मालिका लिह्ण्याची वेळ आली तर मी कमी पडायला नको म्ह्णून. तशी शक्यता जवळ पास नाहीच. असो ! तो मुद्दा नाही. दोन्ही मालिकांत विषय एकच मूळ्नावात बदल करण्याचा पण दोन्हीकडे मला दोन मत प्रवाह दिसले. एका मालिकेतील नायिका मूळ्नावात बदल करण्याला विरोध करत होती आणि दुसर्या मालिकेतीला नायिका आपल्या होणार्या नवरयाशी मिळत – जुळ्त नाव शोधण्यासाठी आनंदाने आट्टहास करत होती. सध्याच्या मालिका आणि सामाजिक बांधिलकीचा काही संबंध असण्याची शक्यता जरा कमीच आहे. याला काही मालिका अपवाद असतात पण त्यांचे शतकही मुश्किलीने साजरे होते. असो ! तो आपला विषय नाही.
— निलेश बामणे
Leave a Reply