नवीन लेखन...

“मृत्युंजय”कारांचा जन्म

आधुनिक वाल्मीकी ग.दि.माडगूळकरांच्या जीवनातील अनेक अज्ञात ह्रदयस्पर्शी प्रसंग आणि त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या अपकाशित पैलूंवर प्रकाशझोत टाकणार्‍या विविध आठवणींचा ‘‘मंतरलेल्या आठवणी‘‘ ह्या श्रीधर माडगूळकरांच्या लेखणीतून साकारलेल्या पुस्तकातील एक आठवण खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.


मग तुम्ही आमच्या कोल्हापूरचेच आहात म्हना की !’’आपल्या निळ्या कोचावर ऐसपैस बसत गदिमा खासकोल्हापुरी हेल काढून म्हणाले आणि समोरच्या खुर्चीतील तरुणआश्चर्याने त्यांच्याकडे नुसता बघतच राहिला.‘गीतरामायण’कार आधुनिक वाल्मिकी गदिमांचे आताअस्सल कोल्हापुरी माणसात रूपांतर झाले होते. वय आणिअनुभवामुळे चेहर्‍यावर आलेला गंभीर प्रौढपणाचा मुखवटा‘कोल्हापूर’ या जादूई नावाने केव्हाच गळून गेला होता. एव्हानाहातातल्या अडकित्याने रोठा सुपारीचे छान कतरी सुपारीत रूपांतरकेले होते.‘‘सुपारी खाणार का ?’’‘‘नाही. नाही.’’ समोरच्या तरुणाच्या मनावरील ‘ग.दि.माडगूळकर’ या नावाचा दबदबा अजूनही उतरला नव्हता. त्यानेघाबरत घाबरत आपल्या हातातील कागदाचे जाडजूड बाडगदिमांच्या हातात दिले. ‘‘ही माझी पहिली कादंबरी आपणनजरेखालून घातलीत तर बरे होईल.’’‘‘हं !’’ असे म्हणून गदिमांनी ते कागदाचे बाड उचलूनजरासे चाळल्यासारखे करून शेजारच्या टेबलावर ठेवले. एव्हानातो समोरचा डोक्यावर तिरकी राखाडी रंगाची कॅप घातलेला, पोलीस किंवा वनखात्यातला अधिकारी वाटाणारा रुबाबदार तरुण, त्यानेनुकतीच नम्रपणे हातात दिलेली त्याची पहिली कादंबरी हे सर्व क्षणभरविसरून गदिमा केव्हाच मनाने त्यांच्या कोल्हापूरमधल्या उमेदवारीच्याकाळात पोहोचले होते.कोल्हापूरचा ‘रंकाळा’ तलाव, त्या तलावाशेजारील भालजीपेंढारकरांचा ‘जयप्रभा स्टुडिओ’, तिथे उमेदवारीच्या काळात मारलेलेहेलपाटे, चेहर्‍यावर मेकपमनने चढविलेला पहिला रंग, शाहुपुरीतीलवाण्याच्या बंद दुकानासमोरील अनेक भुकेल्या रात्रींना आसरा देणारी लाकडीफळी, शिवाजी पेठेतील बाबूराव फडतर्‍यांचे कटिग सलून, तिथे जमणार्‍यामित्रमंडळींनी दिलेले प्रोत्साहन… सारे सारे गदिमांच्या डोळ्यांसमोर क्षणार्धाततरळून गेले. ‘‘माझ्या कादंबरीचे स्क्रीप्ट आपण डोळ्यांखालून घालालना ?’’ या त्या तरुणाच्या आर्जस्वी स्वराने गदिमा झट्कन भानावर येतम्हणाले, ‘‘कोल्हापूरला गेलात की तेवढा आर.के.ला माझा नमस्कारसांगा.’’‘‘हो सांगतो ना.’’ असे म्हणत त्या तरुणाने परत एकदा गदिमांनाखाली वाकून नमस्कार केला. गदिमांकडे नजर

जाताच त्याला त्यांचा चेहराजरा गंभीरच वाटला. आतापर्यंत अनेक मान्यवर लेखकांना, प्रकाशकांनात्याने ते कादंबरीचे बाड आशेने वाचायला दिले होते. त्यातल्या अनेकांनामहिना-दीड महिना लावूनही एकतर ती कादंबरी वाचायला वेळ झालानव्हता, नाहीतर अजून सुधारणेला खूप वाव आहे ती करून नंतर माझ्याकडेया असे काहीतरी मोघम गोलमाल उत्तर देऊन अनेकांनी त्यांना हळुवारपणेपण कटवलेच होते. गदिमांकडूनही अशाच काहीतरी उत्तराची मनात अपेक्षाधरूनच तो तरुण परत माघारी फिरला होता.मात्र सुारे एक महिन्यानंतर त्या तरुणाने पंचवटीच्या प्रांगणात पाऊलटाकले तेव्हा एक वेगळा सुखद अनुभव त्याची वाट पाहात होता….बंगल्याच्या फाटकातून आत शिरताच, ‘‘या राजे ! कोल्हापूरहून कवाआलात ?’’ असे आपलेपणाचे खणखणत आवाजात स्वागत सदरेवरूनझाले. समोर साक्षात् गदिमा… पांढरेशुभ्र धोतर… त्यावर पिवळसर सिल्कचानेहरू शर्ट आणि त्यावर रुबाबदार खादीचे जाकीट घालून बाहेर जाण्याच्यातयारीतच उभे होते.

‘‘आता कसली आपल्या कादंबरीवर चर्चा होणार ? गदिमा तर बाहेरनिघालेले दिसतायत. निदान त्यांनी आपली संपूर्ण कादंबरी वाचली तरीअसेल का ?’’ असे निराशाजनक विचार त्या तरुणाच्या मनातडोकावण्याच्या आत अण्णांनी शेजारचा फोन उचलला. कुठला तरी फोननंबर फिरवून म्हणाले, ‘‘कुलकर्णीमास्तर, एक स्थळ आलंय. मुलगीनाकीडोळी नीटस आहे. आम्हाला आवडली. बघा तुम्हाला पसंत पडतेयका ?’’‘‘द्या पाठवून. तुम्हाला आवडली ना मग झालं तर’’ असे समोरूनउत्तर आले असावे. आणि फोन ठेवला गेला. गदिमा त्या तरुणाकडे वळलेआणि म्हणाले, ‘‘कॉन्टिनेंटलच्या अनंतराव कुलकर्णीना भेटा. मुलगी नाकीडोळी नीटस आहे.’’ या दोन वाक्यांचा आपल्या मनाशी अन्वयार्थ लावतत्या तरुणाची पावले कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या ऑफिसकडे वळली.मराठी वाङयाच्या प्रांतात एक नवा इतिहास घडत होता. गदिमांच्याशिफारशीने आलेल्या त्या कादंबरीच्या बाडाने साहित्याच्या प्रांतात एकनवे युग निर्माण केले.‘मृत्युंजय’ या कादंबरीने मराठी साहित्यातील लोकप्रियतेचे व खपाचेसर्व विक्रम मागे सारले. या एकाच कादंबरीने ‘शिवाजी सावंत’ याकोल्हापूरच्या मर्दानी तरुणाचे ‘मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत’ या दिग्गजसाहित्यिकात रूपांतर झाले. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे या कादंबरीचेप्रकाशनही नंतर गदिमांच्याच शुभहस्ते झाले.

— श्रीधर माडगूळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..