“हिंदी-चीनी भाई भाई” असे म्हणता म्हणता आपल्या या चीनी भावाने किती प्रगती केली याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी आला. दुसर्या महायुध्दात चीनची अक्षरश: कंबर मोडली होती मात्र खचुन न जाता जगाच्या नकाशावार चीनने नुसते आपले अस्तित्वच नाही तर जगाच्या धावत्या स्पर्धेत नव्या ताकदीने उडी घेतली.. दुसर्या महायुध्दात जळुन खंडर झालेल्या चीनने दारिद्र, वाढती लोकसंख्या यासारख्या प्रश्नांशी लढा देत शांघाय, बिजिंगसारखी शहरं घडवली.. चीनमध्ये झालेल्ये आशियायी गेमस् मध्येही त्याने परत एकदा आपली स्वप्नपूर्तीची ताकद जगाला दाखवुन दिली. आता तर जागतिक बाजारपेठ काबीज करण्याच्या स्वप्नाने चीनला झपाटलचं आहे .. बाजार पेठेत चीनी वस्तु कमीत कमी किंमतीत विकण्याचं त्यांच ध्येय पूर्ण होताना दिसतयं.. चीनी वस्तु स्वस्त विकण्याच्या ध्यासाने कित्येक कित्येक चीनी मजूरांच शोषण होतं.. काही वर्षांनी त्यावरही उपाय आणायची हमी देत त्याने जागतिक व्यापार पेठ व्यापली.. भारताची बाजार पेठही त्याला अपवाद नाही. भारतीय मालाच्या तुलनेत अतिशय कमी किमती व विविधता या वैशिष्टय़ांच्या जोरावर चीनच्या या वस्तूंनी भारतात जम बसवला आहे. त्यांनी आतापर्यंत देशी बाजारपेठेतील २० टक्के वाटा पटकावला असल्याचा या क्षेत्रातील व्यावसायिकांचा अंदाज आहे. किमती कमी असल्याने भारतीय विक्रते व ग्राहकांचीही चिनी वस्तूंना पसंती लाभत असल्याचे निरीक्षण आहे.भारतीय बाजारपेठेत खेळण्या,मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तुंपासून आपल्या देवांच्या तसबीरी ते पुजेच्या साहित्यापर्यंत चीनचही घुसखोरी आहे. आता चीनी बोन्सायनेही आपल्या बाजारपेठेत आपले वर्चस्व दाखवायला सुरू केले आहे. आता तर आपल्या घरात आणि परसातही या चिनी रोपांचा शिरकाव होतो आहे. चिनी उत्पादकांनी ‘फेंगशुई’च्या माध्यमातून गुडलक प्लांट (लकी बा
बू) यासारखी काही रोपे भारतीय बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात पाठवली आहेतच. त्याचबरोबर आता विविध शोभिवंत रोपेसुद्धा भारतात पाठविली जात आहेत. त्यात आकर्षक रंगीत पानांचे अॅग्लोनिमा, वैशिष्टय़पूर्ण बर्डनेस्ट फर्न, ‘पाम’चे विविध प्रकार, तीन
रंगांची फुले असलेली बोगनवेल अशा अनेक प्रकारच्या रोपांचा समावेश आहे आणि आता चिनी बॉन्सायला देखिल देशी बाजारात विशेष मागणी
आहे.पुण्यासारख्या छोटय़ा बाजारपेठेत या वर्षी किमान वीस लाख रुपयांची बॉन्साय आली आहेत. हे प्रमाण झपाटय़ाने वाढत
आहे. भारतात तयार होणाऱ्या बॉन्सायच्या तुलनेत चिनी माल निम्म्या किमतीत मिळत आहे. त्यामुळे विक्रेते व ग्राहकांचा
त्याकडे ओढा वाढत आहे. याशिवाय रोपे लावण्यासाठी मातीऐवजी वापरले जाणारे हायड्रोटोन, जेली असे पदार्थ तसेच, बागकामासाठी लागणाऱ्या विविध अवजारांनीसुद्धा भारतीय बाजारपेठत मोठय़ा प्रमाणात जम बसवला आहे. त्यामुळेच हेज कटर, सिकॅटर, विविध प्रकारच्या करवती, स्प्रिंक्लर, इलेक्ट्रॉनिक लॉनमूव्हर अशी चिनी बनावटीची अवजारे स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अशा चिनी उत्पादकांचे वितरण करण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचे सध्याचे चित्र आहे.
— स्नेहा जैन
Leave a Reply