नवीन लेखन...

मैत्रि



“मैत्रि” हा शब्दच नुसता उच्चारला तरी मनांत एक आनंदाची लहर आल्याखेरीज राहत नाही. ज्यांनी मैत्री कधी अनुभवलीच नाही त्यांच्यासाठी हा शब्द भलेही खुपच लहान असेल पण यांच छोट्याशा शब्दांत किती तीव्रता, भव्यता दडलेली आहे, याची प्रचिती खर्‍या मित्रांनाच येणार.

“मैत्रि” ही एक कधीही न शमणारी

तहान, एक तडप आपल्या सोबतीला मिळविण्याची. तो एक दृढ विश्वास आहे दोन जीवांमधला. जो सहजासहजी कोणि तोडू शकत नाही. दोन वेगवेगळ्या जीवांमधला वास्तव्य करणारा एकच आत्मा म्हणजे “मैत्रि” खरंतर, याची महती शब्दांत व्यक्त करणं तसं अवघडचं, शब्द सुद्धा अपुरे पडतात. खरेतर, आपल्यावर कोणीतरी प्रेम करतेय ही भावनांच कित्येक पटीने श्रीमंत करते माणसाला.

मैत्रीमध्ये सहवासाला नक्कीच महत्त्व आहे. जुन्या लोणच्यासारखी जुनी मैत्रि मुरत जाते. यांत एकमेकांचे स्वरुप बरेचसे कळालेले असते एकमेकांसमोर आपली विशिष्ठ प्रतिमा उभी करण्याची गरजच भासत नाही. आपण जसे आहोत तसे निखळ व निर्भयपणे एकमेकांसमोर उभे असतो याच स्वाभाविक संबंधातून एक स्थैर्य, आत्मिक समाधान लाभते. भोवतालच्या फसव्या, अस्थिर जगांत मैत्रि सारखा स्थिर आधार नाही.

मैत्रिमध्ये पायांखालची जमिन ही जमिनच असते. मयसभेप्रमाणे जमिन समजून पाय ठेवावा तर पाण्यात पडतो व पाणी समजून सांभाळावे तर जमिन लागावी असे मुळीच होत नाही. जिथे फसवेपणाला थाराच नाही म्हणूनच खर्‍या मैत्रिचे एखादे ठिकाण तरी प्रत्येक माणसाला हवेच. जिथे मनुष्य पूर्णपणे मोकळा श्वास घेवू शकतो. व त्यामुळे सर्व जगांकडे प्रेमाने पहाण्याची एक दिव्यदृष्टी त्याला प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही.

— सुषमा एडवण्णावर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..