मोठं होण म्हणजे नक्की काय असतं ?
माझा बाप म्हणतो…
लग्न कर ! पोर काढ ! मग कळेल तुला मोठं होणं म्हणजे नक्की काय असतं…
मी मनात म्हणतो बापाला…
तुम्ही आम्हालाच काढलं नसत
तर झालाच नसता ताप तुम्हाला मला आणि आता जगाला…
लोक पोरं काढण्यासाठी लग्न करतात
किती हा मूर्खपणा ?
ती तर लग्न न करताही हल्ली होतात…
पोरं होण्याचा आणि मोठं होण्याचा काही संबंध आहे का ?
मला वाटत राहत आपल्या देशात फक्त बापच मोठा होतो…
बाकीच्यांना फक्त प्रश्नच पडतो
मोठं होणं म्हणजे नक्की काय असतं ?
कवि – निलेश बामणे ( बी डी एन )
Leave a Reply