|| हरी ॐ ||
सुनंदा बरेच दिवसांनी भेटलेल्या आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारताना स्वत:च्या मुलीबद्दल सांगते, “पंकीता एवढं खाते पण ते कधी तिच्या अंगी लागतच नाही नेहमी बघावे तेव्हां एका हातात मोबाईल नाहीतर आय-पॉड आणि दुसऱ्या हातात जेवणाची/खाण्याची थाळी, नेहमी यांना सगळ्याची घाई, गडबड, वेंधळेपणा नाहीतर तर विसराळूपणा, आणि आता तर काय त्यावर फेसबुक, ट्वीटर, मेल, आणि आणखी काय काय खरचं काय कराव तेच कळतं नाही बघ” असे संवाद अनेकांच्या घरात, ट्रेन, ऑफिस, लग्न-समारंभात किंवा पार्टीच्या वेळी दोन, मैत्रिणींत, स्त्रियांत घडत असतात असे पाहण्यात येते.
इस्त्रायलसारख्या छोट्या देशाने इच्छाशक्ती आणि मनोधैर्याच्या जोरावर देशासमोरील अर्थ, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रात, देशात सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असताना त्या संकट आणि समस्येंवर मात करत आपला देशाचा एक वेगळा ठसा सर्व प्रगतदेशा समोर उभा केला त्याच देशातील एका हॉटेल मालकाने वरील समस्येवर एक नामी उपाय शोधून काढला आहे याबद्दलची सुंदर माहिती “…तर ५० टक्के सुट” या लेखात रेवती दळी यांनी दैनिक ‘प्रत्यक्ष’मध्ये दिनांक २५ नोव्हेंबर २०१३ देऊन एका हॉटेल मालकाच्या प्रामाणिक सामाजिक चळवळीला हातभार लावला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि अभिनंदन ! त्या हॉटेल मालकाची देशभक्ती, ग्राहकाबद्दलची आस्थ, प्रेम त्याच्या कृतीतून दिसून येते. मग त्यासाठी थोडे पैसे कमी मिळालेले तरी चालतील पण त्यांनी मन शांत ठेऊन त्याच्या हॉटेलमधील पदार्थ खाऊन तृप्त व्हावे आणि त्यांना चांगले आरोग्य लाभावे हा सदहेतू दिसून येतो.
असो. कुठलीही स्कीम जाहीर केल्याशिवाय ग्राहक गांभीर्याने एखादी वस्तू विकत घेण्यासाठी, पाहण्यासाठी किंवा आवडली तर खरेदी करण्यासाठी दुकानात किंवा मॉलमध्ये जात नाहीत हा तर सर्वच विक्रेत्यांचा आणि
ग्राहकांचा नित्य अनुभव आहे. परंतु मोबाईल फोनचा अतिवापर जेवणा-खाण्याच्यावेळी टाळण्यासाठी इस्त्राईलमधील एका हॉटेल मालकाने माणसांच्या आर्थिक बचतीच्या मानसशास्त्राचा उपयोग केल्याचे लक्षात आले. सध्याच्या महागाईच्या काळात आर्थिक बचतीने आणि मन शांत ठेऊन घरच्यांबरोबर, मित्रांबरोबर, सहकार्यांबरोबर जेवणाची आणि खाण्याची पद्धत जी लुप्त होत चालली आहे त्याला कुठेतरी खीळ बसेल अशी आशा आहे पण त्यासाठी आपल्या देशातील हॉटेल मालकांनी लक्षात ठेऊन मोठया खुबीने अश्या स्कीम राबवल्या तर नक्की देशातील नागरिकांचे आरोग्य आणि मानसिक संतुलन राखण्यास मदतच होईल. सध्या बहुतेकांकडे वेळ हाच एक कमतरतेचा मुद्दा आहे. निदान काहीजण तो कमी असल्याचे दाखवतात. त्यामुळे टीव्ही पाहणे, मोबाईलवर बोलणे, वृत्तपत्र-पुस्तके वाचणे, अश्या अनेक गोष्टी जेवताना उरकल्या जातात. यातून जेवणाकडे तर दुर्लक्ष होतेच; शिवाय आप्तांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधीही आपण गमावत असतो, हे पटकन ध्यानात येत नाही. मोबाईलमुळे सर्वांशी संपर्क कमी होत चालला आहे आणि त्यातून प्रत्येक कामामध्ये व्यत्यय येण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्या आपण अनेक कार्यालयांमध्ये कामाच्या वेळेत फोनवर बोलायलाही मनाई केली असल्याचे वाचतो/ऐकतो/अनुभवतो. तंत्रज्ञानाच्या अधीन होऊ नका, असे सांगणारे उपक्रम वेगवेगळ्या पातळ्यांवर जगभरात राबवले जातात परंतू जेवताना मोबाईल बंद ठेवल्यास त्या हॉटेल मालका इतकी जेवणात सूट दिली जात नाही. उलटपक्षी जेवताना/खाताना मोबाईल बंदच ठेवा अश्या सूचना हॉटेलमध्ये लावलेल्या असतात. कमी-अधिक प्रमाणात सवलत देण्याचे धोरण अनेक जण स्वीकारण्यामागे हाच विचार असावा. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. पण, सध्या आभासी दुनियेतील वावर अवाजवी वाढल्याने त्याचे सामाजिकपण आटत चालले आहे, हेही तितकेच खरे. इथे विरोध तंत्रज्ञानाला नसून त्याच्या अतिवापराला आहे आणि सुज्ञांना याचे महत्त्व नक्कीच पटेल. हा प्रयोग घरच्या घरी प्रत्येकाने करण्याजोगा आहे असे या निमित्ताने सांगावेसे वाटते.
तंत्रज्ञान ही चांगलीच गोष्ट आहे, पण ते माणसासाठी आहे हे आधी त्याने नीट लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि माणूस त्याच्यासाठी नाही हेही लक्षात ठेवणे तेव्हढेच जरुरी आहे नाहीतर अनर्थ ओढवू शकतो. तशा अनर्थाची उदाहरणे नेहमीच अनुभवायला मिळतात आणि ती देशातच नाही, तर ती सर्व दूर परदेशातही समस्या कशी हाताळायची, याविषयी समाज प्रमुख, शासनकर्ते आणि तज्ज्ञही विचार करत आहेत. तसेच सामान्य नागरिकही आपापल्या परीने यातून काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत पण……!
शाळेतून आले की कधी एकदा खेळायला जातो असे सर्वच मुलांना नेहमीच वाटते. पण आता खेळ बदलले आहेत. मुले लपंडाव, डब्बा ऐसपैस, दगड का माती, खो- खो, चोर पोलिस, मधला कावळा, रुमाल-पाणी, कब्बड्डी, आट्यपाट्या, लंगडी, मी शिवाजी, अप्पारप्पी इतर हि अनेक खेळ खेळतांना दिसत नाहीत. आधी हे खेळ माहित असतील तर खेळणार ना? आता मुळात बाहेर जाउन खेळणेच मुळात कमी झालेले दिसते. टि. व्हि. गेम , कॉंप्युटर गेम, मोबाईलमुळे मैदानात अगर रस्त्यावर जाउन खेळणे ही गोष्टच नष्ट होत चालली आहे. त्यातून मैदानात जाणे झालेच तर क्रिकेट शिवाय इतर खेळ खेळणे माहितच नसतात. कारण क्रिकेटला ग्ल्यामर, पैसा आणि प्रसिद्धीही झटपट मिळते. क्रिकेट शिवाय खेळ खेळताना त्यात समरसून खेळणे आवड नाही. कारण कपडे खराब न करता व अंग बचाउन खेळणे दिसते. खेळ खेळताना लागेल, धडपडायला होईल, खरचटेल, आई ओरडेल अश्या शंका कुशंका मनात ठेऊन खेळले तर क्रिकेट सोडून कुठल्याच खेळत आवड नसते. भीतीच जर अधिक असेल तर तो खेळ कसला? अश्या खेळातून अंग बचावणे पुढे जीवनात परावर्तित होते आणि भविष्यात जीवनातील स्पर्धांना तोंड देताना नाकीनऊ येतात. लीडरशीप जमत नाही. बावचळ्यासारखे होते, अश्याने मुलं आत्मविश्वास गमावून बसतात. हे बदलण्यासाठी काय करता येईल?
जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply