हिंदू संस्कृतीनुसार पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानन्तर, मानव जन्माला आल्यापासून आजवर तीन युग होऊन गेले आहेत. पहिले युग “सत्य” युग, दुसरे “त्रेता” युग आणि तिसरे “द्वापार” युग. तसेच हे वर्तमान युग म्हणजे “कलियुग” आहे.
अशी हि युगांची संकल्पना आपल्या चार (ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्वेद) वेदात आहे.
“युग” या संकल्पनेची व्याख्या करताना आणखी एक काल मापक संकल्पना या चार वेदात आढळून येते आणि ती म्हणजे “तप”. “तप”ची व्याख्या सरळ आहे -“बारा वर्षांचा काळ म्हणजे एक तप”, आणि हजार तपांचे एक युग होते. याचाच अर्थ असा कि, “बारा हजार वर्षांचा काळ” हा एक “युग” असतो.
सर्वात पहिले “सत्ययुग” हे आदिपुरुष राजा मनु चे मानले जाते. ज्याच्या काळात सत्ययुगाच्या शेवटी पृथ्विवरचा पहिला जल प्रलय आला होता, असा वेदांमध्ये उल्लेख आहे. जल प्रलयानंतर पुन्हा जीवन उत्पत्तीसाठी भगवान विष्णू ने त्यांचा पहिला मत्स्य अवतार घेऊन मनु ला मदत केली होती.
पुढे दुसरे, “त्रेतायुग” हे विष्णूचाच पूर्णावतार प्रभू श्रीरामाने गाजवला. याच युगात रामाने माता वैष्णवी ला मी पुन्हा कलियुगात “कलकी” या नावाने अवतार घेऊन तुमची माझ्यासोबत विवाह करण्याची इच्छा पूर्ण करेल असे वचन दिले होते. याचप्रमाणे रामाने भक्त हनुमानास कलियुगाच्या अन्त्ता पर्यंत पृथ्वीवर वास करशील असा वरदान दिला होता. या दोन्ही घटनांचा रामायणात उल्लेख आहे.
यावरून असे लक्षात येत कि युग हि संकल्पना काळ मापाकांमध्ये सर्वात व्यापक अशी होती. त्यानंतर तिसऱ्या युगात विष्णूने “श्रीकृष्ण” हा मानवावतार घेतला, ज्याला आपण “द्वापारयुग” असे संबोधतो. श्रीकुष्णाने सुद्धा त्याच्या गीतेत चारी युगांचे वर्णन केले आहे. महर्षी व्यास लिखित महाभारतात कलियुगाच्या प्रारंभाची कथा नमूद आहे. अर्जुनाचा पौत्र (नातू) तसेच अभिमन्यू चा पुत्र “राजा परीक्षित” पासून म्हणजे जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी (ई. स. पूर्व ३०००) कलियुगाची सुरुवात झाली. याचा अर्थ असा हि लागतो कि, कलियुगाची १२००० पैकी ५००० वर्षे निघून गेली आहेत आणि आणखी ७००० वर्षांचा कालखंड बाकी आहे.
महाभारतात असा उल्लेख आहे कि कलियुगाचा अंत हा जल प्रलयाने नाही तर अग्निप्रलायाने होणार आहे. या अग्निप्रलायास सूर्य कारणीभूत असेल. सूर्यावर अग्नीचे प्रचंड लोळ उठतील जे पृथ्वीवरील जीवन नष्ट करेल.
— श्री.श्रीकांत अमरसिंग अंबेरे उर्फ श्रीकांत कुमावत
Leave a Reply