नवीन लेखन...

येवल्याचा प्रसिध्द झणझणीत भेळभत्ता

संपूर्ण महाराष्ट्रालाच नाहीतर देशालाही येवल्याच्या पैठणीची ओळख असून या शहराला फार जुना इतिहास आहे. तात्या टोपेंची जन्मभूमी , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच येवल्यात धर्मातंराची घोषणा केली होती. महाराष्ट्रात १५० वर्ष पूर्ण केलेल्या तीन जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका येवल्याची आहे.

अशा या ऐतिहासिक शहराची खादय संस्कृतीची एक वेगळी ओळख आज निर्माण झाली आहे ती म्हणजे येवल्याचा सुप्रसिध्द झणझणीत भेळभत्ता आणि सुंदर गोड बासुंदी ! येवला शहरात प्रवेश केला की, भेळभत्यांची अनेक दुकान दिसू लागतात. भत्ता म्हणजे फरसाण आणि सुक्या भेळेचे मिश्रण भावनगरी, पापडी, तिखट आणि बारीक शेव, चिवडा, डाळ मसूर, कांदा कोथींबीर , लिंबू आणि सोबत हिरवी मिरची असा दहा रुपयाचा भत्ता घेतला की मन तृप्त होते. चवीस्ट व स्वाधिष्ट भत्ता एकदा खाल्ला की नेहमी खावासा वाटतो. या भत्त्याला कायस्थ भेळ ५० वर्षाची परंपरा आहे.

येवलयाच्या भेळभत्ता खाण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक येतात येथे माहेरी येणा-या मुली सासरी जातांना सोबत भेळभत्ता घेवून जातात. गावात येणारा प्रत्येक पाहुणा आपल्या सोबत भत्ता घेवून जातो. दररोज हजारो रुपयांची उलाढाल या भत्ता व्यवसायामुळे होते. कोष्टी समाज या व्यवसायात मोठया प्रमाणात आहे. या व्यवसायामुळे २०० ते ३०० लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या व्यवसायावर अनेक लोक श्रीमंत झाले आहेत. येवला शहरात एक स्वतंत्र भेळ भत्ता गल्लीच आहे. येथे नेहमी भत्ता खाणा-यांची गर्दी असते.

हा व्यवसाय आता आधुनिकतेकडे वाटचाल करत असून येथे भत्त्याची वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी मोठी मशिनरी उपलब्ध झाली आहे.

या भेळभत्त्याप्रमाणेच येथील गोड बासुंदी सुध्दा स्वादिष्ठ आहे. १०० वर्षाहून ही जूने असलेले बच्चुभाई हलवाईवाले यांच्या दुकानात बासुंदी पिण्यासाठी प्रचंड गर्दी असते. बासुंदी सोबतच इतर प्रकारची मिठाई येथे मिळते. बच्चुभाईची तिसरी पिढी पासून हे मिठाईचे दुकान सुरु आहे.

हा भेळभत्ता व बासुंदीचा स्वाद अनेक छोट्या मोठया व्यक्तींनी खाल्ला आहे. येवल्याला येणारा प्रत्येक व्यक्ती या भत्त्याची आवडीने मागणी करतात. भेळभत्ता व बासुंदी या दोन्ही वस्तूमुळे येवल्याची एक खादयसंस्कृतीने आपला एक वेगाळसा ठसा नाशिक जिल्हयात तसेच इतरत्र उमटवला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..