साहित्य-
सव्वा कप किसलेले रताळे
२ टीस्पून साजूक तूप
२ कप दूध
३ टेबल स्पून साखर
अर्धा चमचा वेलची पूड
२ टेबलस्पून ताजा खवलेला नारळ
सजावटीसाठी बदामाचे काप
कृती-
प्रथम रताळे सोलून व किसून घ्यावे. रताळे किसून न घेता उकडून घेऊन कुस्करुन घेतले तरी चालतील. एका कढाईत तूप गरम करावे, त्यात किसलेले रताळे घालून नीट परतून घ्यावे. रताळ्याचा रंग जरा बदलल्यावर त्यात दूध घालावे व एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर त्यात साखर घालावी व नीट एकजीव करून घ्यावे. रताळी चांगली शिजून द्यावी. हा शिरा थोडा ओलसरच ठेवावा व लागल्यास दूध किंवा पाणी घालावे. यात खवलेला नारळ, वेलची पूड व बदामाचे काप घालावेत व गॅस बंद करावा.
— सौ.सुरेखा कुलकर्णी
Leave a Reply